एक्स्प्लोर
Advertisement
WhatsApp मध्ये पेमेंट सेटअप अॅक्टीव कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
व्हॉट्सअॅपवर मॅसेज करणे जेव्हढं सोप्प आहे, तेव्हढचं आता पैसे पाठवणेही सोपं झालं आहे. आपल्याला फक्त एकदाच सेटिंग्ज बदलाव्या लागतील आणि त्यानंतर आपण आपल्या कोणत्याही संपर्कांना संदेश पाठवू शकता.
भारतात WhatsApp Pay लॉन्च झाला आहे. म्हणजेच आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरुन पैसेही पाठवू शकता. NPCI ने केवळ 20 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांना परवानगी दिली आहे. व्हॉट्सअॅपचे भारतात 400 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. अशा परिस्थितीत, आता केवळ 20 दशलक्ष वापरकर्त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. कारण एनपीसीआयने अलीकडेच थर्ड पार्टी यूपीआय व्यवहारांवर 30% कॅप लादली आहे. हे 1 जानेवारी 2021 पासून लागू होईल. तुम्ही WhatsApp वापरत असल्यास WhatsApp Pay सक्रिय करू शकता. चला तर जाणून घेऊया WhatsApp Pay कसं अॅक्टीवेट करायचं.
WhatsApp Pay अॅक्टिवेट कसे करावे?
- सर्व प्रथम, अॅप स्टोअर किंवा Google Play Store वर जा आणि आपले व्हॉट्सअॅप अॅप अपडेट करा.
- आता तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेटींग्सवर जावे लागेल. Payment पर्याय सेटिंग्जमध्ये दिसत असेल तर आपल्या सेटिंग्जला फॉलो करा.
- पेमेंट विभागात गेल्यावर तुम्हाला नवीन पेमेंट आणि Add New Payment Method चा पर्याय मिळेल. आपल्याला नवीन पेमेंट पद्धत जोडावी लागेल.
- आता आपल्याला नवीन पेमेंटमध्ये जाऊन आपलं बँक खाते निवडायचं आहे.
- आपल्याला बर्याच बँकांची यादी दिसेल. बँक निवडल्यानंतर, आपले खाते व्हेरीफाय केलं जाईल. तिथे Verify Via SMS चा पर्याय सापडेल. तो सिलेक्ट करा.
- विशेष म्हणजे आपला व्हॉट्सअॅप नंबर आणि अकाऊंट एकत्र लिंक करण्यात आलं आहे. मात्र, नंबर एकच असायला हवा, तेव्हाचं व्हेरीफिकेशन होईल.
- व्हेरीफिकेशननंतर, फिनिश पेमेंट सेटअपवर टॅप करा. आता आपल्याला अन्य अॅप्समध्ये दिलेल्या माहितीनुसार यूपीआय पिन सेटअप करण्याचा पर्याय मिळेल. प्रत्येक देयकावर यूपीआय पिन प्रविष्ट करणे आवश्यक असेल.
- सेटअप पूर्ण झाल्यानंतर WhatsApp वरही मॅसेजप्रमाणे पैसे पाठवू शकता.
- आपल्याला आपल्या WhatsApp कॉन्टॅक्ट वर टॅप करुन चॅटिंग बॉक्स ओपन करायचा आहे.
- आता आपल्याला अटचमेंट आइकॉन वर जाऊन Payment चा ऑप्शन वर टॅब करुन अमाऊंट टाकायची आहे.
- WhatsApp Payment फक्त व्हॉट्सअॅपच्या यूजर्ससाठीचं नाही तर ज्यांचे UPI अॅक्टिव आहे, त्यांनाही तुम्ही पैसे पाठवू शकता.
- पैसे पाठवताना आपण नोट्स किंवा मजकूर देखील लिहून पैसे पाठवू शकता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
बातम्या
Advertisement