एक्स्प्लोर
दिवसाला जिओचा 1GB डेटा पुरत नाही? आता चिंता मिटली
जिओने चार असे प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दिवसभरात कितीही डेटा वापरता येईल.
![दिवसाला जिओचा 1GB डेटा पुरत नाही? आता चिंता मिटली Jio’s four plans which don’t have limit for deta use दिवसाला जिओचा 1GB डेटा पुरत नाही? आता चिंता मिटली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11203247/jio-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिलायन्स जिओचे डेटा प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत काहीसे स्वस्त असले तरी दिवसभर किती डेटा वापरायचा यासाठी मर्यादा आहे. मात्र ही ग्राहकांची चिंता आता कंपनीने दूर केली आहे. कारण चार असे प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दिवसभरात कितीही डेटा वापरता येईल.
999 रुपये : या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी 60GB डेटा देण्यात आला आहे. इतर प्लॅनप्रमाणे दिवसभरात किती डेटा वापरायचा याची मर्यादा या पॅकमध्ये नाही. तुम्ही दिवसभरात कितीही डेटा वापरु शकता. शिवाय मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज देण्यात आले आहेत.
1999 रुपये : मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजसोबत या प्लॅनमध्ये 180 दिवसांसाठी 125GB डेटा देण्यात आला आहे. युझर्स आपल्या गरजेप्रमाणे कितीही डेटा वापरु शकतात, त्यासाठी मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
4999 रुपये : या प्लॅनमध्ये 360 दिवसांसाठी 350GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज देण्यात आले आहेत. यामध्येही किती डेटा वापरायचा याची मर्यादा देण्यात आलेली नाही.
9999 रुपये : या प्लॅनमध्ये 360 दिवसांसाठी 750GB डेटा देण्यात आला आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजही मिळतील. नियमित डेटा वापराची मर्यादा देण्यात आलेली नसल्यामुळे ग्राहक कितीही डेटा वापरु शकतात.
![दिवसाला जिओचा 1GB डेटा पुरत नाही? आता चिंता मिटली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/11203219/jio-51.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)