Jio True 5G: Jio युजर आहात अन् 5G वापरायचंय? फोनमध्ये चेंज करावी लागेल 'ही' सेटिंग
Jio True 5G: जियोनं 5जी सर्विसचा वापर करण्यासाठी आपल्या युजर्सना मेसेज केला आहे. जियो TRULY UNLIMITED 5G डेटा आतापर्यंत 12 शहरांत रोलआऊट करण्यात आलं आहे.
Jio True 5G: सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे, असं गमतीनं म्हटलं जातं. इंटरनेटनं क्रांती केली. आता सगळं इंटरनेटशी जोडलं गेलं असून इंटरनेट आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अशातच तुम्हाला आता आणखी जलद इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना चांगला इंटरनेट स्पीड आणि उत्तम कॉलिंग अनुभव देण्यासाठी सतत काम करत असतात. एअरटेलनंतर जिओनंही देशात अनेक ठिकाणी आपली 5जी सेवा सुरू केली आहे. तुम्हालाही Jio च्या 5G सेवेचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग्ज करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनमध्ये 5G सेवेचा लाभ घेऊ शकाल. यासंदर्भात जिओनं युजर्सना सेटिंग्जबाबत मेसेजही केला आहे.
Jio कडून मेसेज
Jio नं 5G रोलआऊट शहरांमधील युजर्सना वेलकम ऑफर पाठवण्यास सुरुवात केली होती, Jio च्या या ऑफरमध्ये, ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1GBPS पर्यंत स्पीड आणि अमर्यादित 5G डेटा मिळत आहे. Jio कडून सांगण्यात आलं आहे की, युजर्सना स्मार्टफोनवर 500 MBPS ते 1 GBPS स्पीड मिळत आहे. जिओनं युजर्सना मेसेज पाठवलाय की, जर तुमच्याकडे TRUE 5G असेल! तर तुमच्या नंबरला जिओ वेलकम ऑफर मिळाली आहे. तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय TRULY UNLIMITED 5G डेटा (1 Gbps पर्यंतचा स्पीड) वापरू शकता.
जियोच्या या वेलकम ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्या सेटिंग्ज केल्यानंतरच तुम्ही जियोच्या वेलकम ऑफरचा लाभ घेऊ शकता.
जियोच्या वेलकम ऑफरचा लाभ घेण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा :
- सेटिंग्स> About Device > Softwear Update वर जाऊन तुमच्या डिव्हाइसचा लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट करा.
- सेटिंग्स> Connection > Mobile Network > Sim > Network Type 5G वर जाऊन - तुमच्या मोबाईल वर 5G नेटवर्क हा पर्याय निवडा.
अधित माहिती मिळवण्यासाठी हे वाचाच
तुम्हाला Jio True 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही सेटिंग्स केल्यानंतरही तुमचं 5जी सुरू होत नसेल, तर तुम्ही जियो कस्टमर केअरसोबत बोलू शकता. तसेच, या https://youtu.be/glqtACtRUDI लिंकला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.