एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिओ फोनची ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग कशी कराल?
जिओ फोन 15 ऑगस्टला लाँच होणार आहे. 24 ऑगस्टपासून ग्राहकांना या फोनसाठी बुकिंग करता येईल आणि सप्टेंबरमध्ये हा फोन ग्राहकांच्या हातात पडणार आहे.
मुंबई : रिलायन्स जिओचा मच अवेटेड जिओ फीचर फोन 15 ऑगस्टला लाँच होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची 21 जुलैला रिलायन्सच्या सर्वसाधारण बैठकीत घोषणा केली. शून्य रुपयात 1500 रुपये तीन वर्षांसाठी अनामत रक्कम ठेवून हा फोन खरेदी करता येणार आहे. 1500 रुपये ग्राहकांना तीन वर्षांनी परत मिळतील.
जिओ फोन उद्या लाँच होणार म्हणजे नेमकं काय होणार, लाँचिंगनंतर बुकिंग का, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. मात्र 15 ऑगस्टला हा फोन लाँच होणार म्हणजे बीटा टेस्टिंग होणार आहे. काही निवडक ग्राहकांनाच हा फोन 15 ऑगस्टला वापरता येईल.
ज्या ग्राहकांना बीटा टेस्टर होता आलं नाही, त्यांना 24 ऑगस्टपासून फोनसाठी बुकिंग करता येईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही प्रकारे तुम्ही फोन बूक करु शकता. बुकिंग झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये या फोनची डिलीव्हरी केली जाईल. लवकरच या फोनविषयी अधिकची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
जिओ फोन कसा बुक कराल?
जिओ फोन 24 ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता. या फोनची किंमत शून्य रुपये असली तरी 1500 रुपये अनामत रक्कम तुम्हाला द्यावी लागणार आहे. जी तीन वर्षांनी परत मिळेल.
153 रुपयात अनलिमिटेड डेटा, मोफत व्हॉईस कॉलिंग
जिओ फोन घेतल्यानंतर ग्राहकांना महिन्याला केवळ 153 रुपये मोजावे लागतील. यामध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड 4G डेटा मिळेल. एका दिवसात हायस्पीड डेटा वापरण्याची मर्यादा दिलेली असेल, या मर्यादेनंतर स्पीड कमी होईल.
जिओ फोनचे फीचर्स
फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.
512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
संबंधित बातमी :
जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, मोफत फोन मिळवण्यासाठी काय कराल?
जिओ फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट नसणार!
खुशखबर! जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅपचं स्पेशल व्हर्जन चालणार?
‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement