एक्स्प्लोर
ग्राहकांसाठी जिओची नवी ऑफर, 12 जीबीपर्यंत एक्स्ट्रा डेटा!
मुंबई : रिलायन्स जिओनं आपल्या यूजर्ससाठी एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. Lyf ब्रॅण्डचा स्मार्टफोनचा खप वाढविण्यासाठी ही रिलायन्सनं नवी ऑफर लाँच केली आहे.
जर तुम्ही Lyf ब्रॅण्डचा कोणताही नवा स्मार्टफोन खरेदी करत असल्यास या खरेदीवर तुम्हाला जिओकडून अतिरिक्त 20 टक्के 4जी डेटा मोफत मिळणार आहे.
ही ऑफर Lyfच्या अर्थ 1, अर्थ 2, वॉटर 1, वॉटर 7S, वॉटर 8, वॉटर 10, वॉटर 11, वॉटर F1, F1S आणि विंड 4S या 10 स्मार्टफोनवर मिळणार आहे. पण ज्यांनी जिओ प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी केली आहे त्यांनाच ही ऑफर आहे.
Lyf ब्रॅण्डचे स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्याच्या सिम स्लॉटमध्ये जिओचं सिम टाकल्यानंतर 48 तासाने यूजर्सला अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळेल.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला 309 किंवा 509 रुपये किंमतीचा प्लान घ्यावा लागेल. 309 रुपयांच्या प्लानमध्ये 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तर 509 रुपयांच्या प्लानमध्ये 12 जीबी डेटा अतिरिक्त मिळणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2018 पर्यंत सहा रिचार्जवरच मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement