एक्स्प्लोर
Advertisement
50 रुपयांत 20 जीबी 3G डेटा, BSNLचं आश्वासन की अफवा?
नवी दिल्ली : बीएसएनएल 50 रुपयांत आपल्या यूजर्सना 20 जीबी 3G डेटा देणार नाही. बीएसएनएलचे सेल्स-मार्केटिंग जनरल मॅनेजर संजय कुमार यांनी याबाबत स्पष्ट केले.
संजय कुमार म्हणाले, “बीएसएनएल 50 रुपयांत यूजर्सना 20 जीबी 3G डेटा देणार असल्याच्या बातम्या कुणी पसरवल्या माहित नाही. मात्र, बीएसएनएलकडून स्पष्ट करतो की, अशाप्रकारचं कोणतंही प्लॅन किंवा ऑफर देण्यात आलेली नाही किंवा जाहीर करण्यात आली नाही.”
बीएसएनएल 20 जीबी 3G डेटा अवघ्या 50 रुपयांत देणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. मात्र, ही अफवा असल्याचं संजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे बीएसएनएलचे जनरल मॅनेजर शब्द यादव यांनी या प्लॅनबाबत सांगितले होते. मात्र, आता कंपनीचे मार्केटिंग जनरल मॅनेजरने या वृत्ताचं खंडन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement