एक्स्प्लोर
अजूनही अॅपलचा सर्वोत्कृष्ट डिव्हाइस येणं बाकी: टीम कूक
मुंबई: स्मार्टफोन कंपनी अॅपल लवकरच 10 वर्ष पूर्ण करणार आहे. अॅपलचा संस्थापका स्टिव्ह जॉबनं 2007 साली पहिल्यांदाच मॅकवर्ल्डमध्ये आयफोन डिव्हाइस लाँच केला होता. 2017 हे आयफोनच्या दृष्टीनं एक मोठं वर्ष आहे. या दहा वर्षाच्या प्रवासाबाबत अॅपलनं एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केली आहे.
यावेळी कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी म्हटलं आहे की, 'अजूनही सर्वोत्कृष्ट डिव्हाइस येणं बाकी आहे. आयफोन हे आमच्या ग्राहकांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहेत. आज आयफोननं कम्युनिकेशन, एंटरटेनमेंटला एक वेगळी परिभाषा निर्माण केली आहे.
त्यामुळे नव्यानं येणाऱ्या आयफोन बद्दल बरीच उत्सुकता आहे.
अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब
आयफोनशी निगडीत खास 10 गोष्टी:
1. 29 जून 2007 रोजी अॅपलनं आपला पहिला आयफोन जगासमोर आणला. हा जगातील पहिला स्मार्टफोन होता. पहिल्या आयफोनचं कोड नेम 'पर्पल' असं ठेवण्यात आलं होतं. अॅपलची खासियत म्हणजे वेळेनुसार त्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये बदल केला. यामुळेच 2007 पासून आजही अॅपलची जादू कमी झालेली नाही.
2. अॅपल आयफोन एक असा फोन होता की, ज्यामध्य कोणतंही बटण नव्हतं.
3. 2007 मध्ये आयफोन लाँच करण्याआधी अॅपलनं आयफोन टेक्नोलॉजीशी निगडीत 200 पेटेंट आपल्या नावावर करुन घेतले होते.
4. अॅप स्टोअर हे जगातील पहिलं असं स्टोअर आहे की, ज्यामध्ये यूजर्स अधिकृतरित्या अॅप डाऊनलोड करु शकतात.
5. 2007मध्ये पहिल्यांदा आयफोन लाँच केल्यानंतर टाइम्सनं त्याला 'इनोव्हेशन ऑफ दी ईयर'नं संबोधलं होतं.
6. अॅपल आयफोन लाँचिंग दरम्यान, कंपनीचा संस्थापक स्टिव्ह जॉबनं स्टाकबक्सला 4,000 कप कॉफीची ऑर्डर दिली होती. पण हा एक प्रँक कॉल होता.
7. मार्चमध्ये अॅपलचे सीईओ टीम कूकनं जाहीर केलं की, आयफोनचे 70 कोटी युनिटची विक्री झाली आहे.
8. सुरुवातीला आयफोनची विक्री आजच्या फ्लॅश सेलप्रमाणे केली जात होती.
9. पहिल्या आयफोनच्या 4 जीबी मॉडेलची किंमत 349 डॉलर आणि 8 जीबी मॉडेलची किंमत 599 डॉलर एवढी होती.
10. आयफोन लाँचिंग दरम्यान, डेमो फेल झाल्यानंतर संस्थापक स्टीव्ह जॉब भलताच भडकला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement