एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंटेक्सचा पहिला 4G-VoLTE फोन लाँच, जिओच्या फीचर फोनला टक्कर
जिओच्या फीचर फोनला टक्कर देण्यासाठी इंटेक्सनं आपला 4G-VoLTE फोन लाँच केला आहे.
मुंबई : रिलायन्स जिओनं आपला नवा फीचर फोन लाँच केल्यानंतर आता या फोनला टक्कर देण्यासाठी इंटेक्सनं आपला नवा 4G VoLTE टर्बो+ फोन लाँच केला आहे. हा फीचर फोन इंटेक्सच्या नवरत्न सीरीजमधील आहे. या फोनची नेमकी किंमत किती असणार याची माहिती अद्याप कंपनीनं दिलेली नाही. पण 700 ते 1500 रुपयांपर्यंत या फोनची किंमत असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
इंटेक्सचा टर्बो+ 4G फीचर फोनमध्ये 2.4 इंच स्क्रिन देण्यात आलं असून यामध्ये QVGA डिस्प्ले रेझ्युलेशन आहे. तसंच हा फोन KaiOS सॉफ्टवेअरवर आधारित असणार आहे. या फोनमध्ये ड्युल कोअर प्रोसेसर असणार आहे. तसेच यात 512 एमबी रॅमही देण्यात आली आहे. तसेच यात 4 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
या फीचर फोनमध्ये कॅमेराही देण्यात आला आहे. यामध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर याची बॅटरी 2000 mAh आहे.
इंटेक्स टेक्नोलॉजीचे प्रोडक्ट हेड शरद अग्रवाल यांनी सांगितलं की, 'आम्ही आधुनिक सॉफ्टवेअर आणि फीचर असणारे 20 नवे स्मार्टफोन दिवाळीपर्यंत बाजारात आणणार आहोत. यापैकी सात मॉडेल हे ऑनलाईन उपलब्ध असतील.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement