Instagram Update : आता इंस्टाग्रामवर बनवा 90 सेकंदाचा व्हिडीओ, रिल्ससाठी नवं फिचर लाँच
Instagram New Feature : इंस्टाग्राम यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता इंस्टाग्रामवर तुम्हाला रील्ससाठी 90 सेकंदांचा व्हिडीओ बनवण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
Instagram Reels 90 Seconds New Feature : तरुणाईत इंस्टाग्रामची (Instagram) प्रचंड क्रेझ आहे. तरुणाई इंस्टागामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. या इंस्टाग्रामचं रिल्स (Insta Reels) हे फिचर चांगलंच लोकप्रिय झालं आहे. या फिचरमुळे इंस्टाग्राम अधिक लोकप्रिय झालं आहे. इंस्टाग्रामने रिल्सचे फिचर देऊन याआधीच मार्केटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता पुन्हा इंस्टाग्रामने रिल्सचं फिटर अपडेट केलं आहे. इंस्टाग्राम आता टिकटॉक (Tik Tok) सारख्या ॲपना टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
इंस्टाग्राम सतत नवीन नवीन फीचर्स घेऊन यूजर्सना आश्चर्यचकित करत असतं. आता इंस्टाग्राममध्ये युजर्ससाठी 90 सेकंदांचा व्हिडीओ बनवण्याचं फिचर लाँच केलं आहे. यामध्ये युजर्सना 90 सेकंदाचे व्हिडीओ बनवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आतापर्यंत वापरकर्त्यांना 60 सेकंदांपर्यंत व्हिडीओ बनवण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण आता याची मर्यादा वाढवून 90 सेकंद करण्यात आली आहे.
मेटा (Meta) मालकीचे इंस्टाग्रामकडूम (Instagram) गेल्या काही दिवसांपासून आपल्या रील सेगमेंटसाठी 90 सेकंदांपर्यंतचे व्हिडीओ बनवण्याच्या फीचरवर काम सुरु होते. हे नवीन फीचर लवकरच सर्व यूजर्ससाठी लाँच करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगितलं जात होतं. हे फिचर अखेर लाँच झालं आहे. या फीचरचा वापर करुन तुम्ही इंस्टाग्राम रील्सवर 90 सेकंदांचा व्हिडीओ बनवून शेअर करु शकाल.
अलिकडच्या काळात इंस्टाग्रामने रील्स सेग्मेंटमध्ये अनेक नवीन फिचर्स आणले आहेत. यात कॅप्शन टू रीमिक्सचा ऑप्शनदेखील उपलब्ध आहे. आणखी बरेच फीचर्स सध्या टेस्टिंगमध्ये आहेत, आगामी काळात इंस्टाग्राम युजर्ससाठी आणखी नवे फिटर आणण्याच्या तयारीत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या