एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय तरुण या गोष्टीसाठी वापरतात सर्वाधिक इंटरनेट!
मुंबई: भारतातील नेटीझन्स इंटरनेटचा सर्वाधिक वापर कशासाठी करतात याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, जयपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद यासारख्या सहा बड्या शहरातील तरुणांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.
या सर्व्हेमधून सर्वांना चकीत करणारा निष्कर्ष समोर आला आहे. 98% तरुणाचं म्हणणं आहे की, ते इंटरनेटचा सर्वाधिक वापर हा ऑनलाइन शॉपिंगसाठी करतात. तर 96% सोशल नेटवर्किंगसाठी करतात.
18 ते 30 वयातील तरुणांना ऑनलाइन बिल भरणं पसंत आहे. दिल्ली आणि बंगळुरुमधील 81% तरुण ऑनलाईन बिल भरतात. तर मुंबईत 69% तरुण आपलं बिल ऑनलाईन भरतात.
ऑनलाइन शॉपिंगसाठी इंटरनेटचा सर्वाधिक वापर होतो कारण की, बऱ्याच ब्रँण्डेड वस्तूंवर बरचंस डिस्काउंट मिळतं. तसंच कॅशबॅक ऑफर, डिस्काउंट कूपन या देखील गोष्टी असतात.
सर्व्हेनुसार, एक भारतीय तरुण यापुढे वर्षभरात जवळजवळ 60% खर्च ऑनलाईन शॉपिंगवरच करेल असा अंदाज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement