एक्स्प्लोर
Advertisement
बार्सिलोनाच्या धर्तीवर आता दिल्लीत ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन
नवी दिल्ली : जगभरातील टेक्नोसॅव्हीच्या नजरा कायमच बार्सिलोनातील ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’कडे लागलेल्या असतात. नव्या तंत्रज्ञानांची घोषणा याच व्यासपीठावरुन केल्या जातात. दरवर्षी बार्सिलोनामध्ये होणाऱ्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’च्या धर्तीवर यंदा दिल्लीत ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन केलं जाणार आहे.
‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन दिल्लीतील प्रगती मैदानात 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. यासाठी 15 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या काँग्रेसमध्ये सुमारे 8 ते 10 देश सहभागी होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल.
सीओएसआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्थ्यूज यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले, “पाश्चिमात्य देशांमध्ये बार्सिलोनात एमडब्ल्यूसी, तर शांघायमध्ये वर्ल्ड मोबाईल काँग्रेस असतं, मात्र दक्षिण-पूर्व आशियात तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणताही मोठा कार्यक्रम नसतो. त्यामुळे दिल्लीत होणारी इंडिया मोबाईल मोबाईल काँग्रेस ही कमतरता भरुन काढेल.”
मॅथ्यूज यांच्या माहितीनुसार, स्वीडन, इस्रायल आणि इंग्लंडसारख्या बड्या देशांनी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. या आयोजनात अमेरिका आणि कॅनडाची मदत व्हावी, याठी चर्चा सुरु आहे.
इंडिया मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आठ ते दहा देश सहभागी होतील, अशी आशा आहे. भारतातील महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक असा हा कार्यक्रम असेल, शिवाय वार्षिक कार्यक्रमही असेल, असेही मॅथ्यूज यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी पी. रामकृष्णा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व्हायब्रंट गुजरातचं आयोजन करणाऱ्या के अँड डी कम्युनिकेशन लिमिटेडकडे संपूर्ण कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
क्राईम
Advertisement