Tulja Bhavani Temple Dharashiv: तुळजाभवानीच्या मंदिरात थुंकणं भोवलं, आठ पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, कठोर कारवाईची शक्यता
Tulja Bhavani: पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद. तीन दिवसात समाधानकारक खुलासा न झाल्यास तीन महिने मंदिर प्रवेशबंदी होणार

Dharashiv News: श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानाने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना (Priest) 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून, तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Tulja Bhavani Temple News)
संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आढळून आले आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत, देऊळ कवायत कलम 24 व 25 अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे. तीन दिवसात समाधानकारक खुलासा न झाल्यास या पुजाऱ्यांना तीन महिने मंदिरात प्रवेशबंदी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Tulja Bhavani Mandir: मंदिरातील पुजाऱ्यांचे वर्तन अशोभनीय
मंदिर प्रशासनाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, पुजारी व्यवसायास अशा प्रकारचे वर्तन शोभणारे नसून, मंदिर परिसरातील पावित्र्याला बाधा पोहोचवणारे आहे. यामुळे मंदिराचे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होत असून, शिस्तीचा भंग होत आहे. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्यास तीन महिन्यांची मंदिरप्रवेश बंदी घालण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Drug peddler Dharashiv: तुळजाभवानी मंदिराचे 13 पुजारी पेडलर?
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीची मोठी चर्चा आहे . 15 फेब्रुवारी 2025 ला तुळजापूर तालुक्यात 2.5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते. ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी राजकीय कनेक्शनही समोर आले होते. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पूजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीशी संबंध झाल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे. पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले होते. कारण आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते. याप्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
आणखी वाचा























