SA vs AUS Day 1 Stumps : WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
WTC Final 2025 SA vs AUS Day 1 Stumps : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेचं केंद्रबिंदू ठरलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पहिल्याच दिवशी थरार शिगेला पोहोचला.

AUS vs SA WTC Final Day 1 Highlights : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेचं केंद्रबिंदू ठरलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये पहिल्याच दिवशी थरार शिगेला पोहोचला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 14 बळी पडले, ज्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी ‘कर्दनकाळ’ ठरली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट गमावून 43 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका अजूनही 169 धावांनी मागे आहे. कर्णधार टेम्बा बावुमा 3 धावांसह आणि डेव्हिड बेडिंगहॅम 8 धावांसह खेळत आहे. त्याआधी अफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 212 धावांत गुंडाळला.
On a day dominated by bowlers, Australia claw their way back into the #WTCFinal! 🙌🏻
— Star Sports (@StarSportsIndia) June 11, 2025
Will their bowlers continue to dominate, or will South Africa show grit with the bat? A crucial Day 2 awaits... ⏳
WATCH DAY 2 👉🏻 #WTCFinal | #SAvAUS | THU, JUN 12, 2.30 PM onwards on Star… pic.twitter.com/VAMrZy7FqG
ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 212 धावांवर ऑलआऊट
नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कागिसो रबाडा आणि मार्को जॅन्सन यांनी कांगारू संघावर कहर केला, परंतु स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टर यांनी ऑस्ट्रेलियाला 200 च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ट्रॅव्हिस हेडपासून मार्नस लाबुशेनपर्यंत अनेक मोठे खेळाडू अपयशी ठरले आणि उस्मान ख्वाजा खातेही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने त्यांचे शेवटचे 5 विकेट फक्त 20 धावांच्या आत गमावले. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने 5 आणि जॅनसेनने 3 विकेट घेतली.
The pressure pays off! 🤩#KagisoRabada strikes twice to spice things up early on in the ICC #WTC25 Final! 💪
— Star Sports (@StarSportsIndia) June 11, 2025
LIVE NOW 👉 https://t.co/9lZGHcdMLn #WTCFinal | #SAvAUS, Day 1, watch LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar pic.twitter.com/U32yfDIWEQ
ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीत कहर केला, पण जेव्हा फलंदाजीची पाळी आली तेव्हा त्यांनाही संघर्ष करावा लागला. आफ्रिकेची स्थिती ऑस्ट्रेलियापेक्षाही वाईट होती. एडेन मार्कराम पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचे 6 खेळाडू फलंदाजीसाठी आले आहेत, त्यापैकी फक्त रायन रिकेलटन धावांच्या बाबतीत दुहेरी आकडा ओलांडू शकला आहे. रिकेलटन 16 धावा काढून बाद झाला.
वियान मुल्डर 6 धावा काढून बाद झाला आणि ट्रिस्टन स्टब्स फक्त 2 धावा काढून बाद झाला. टेम्बा बावुमाने आतापर्यंत 3 धावा काढल्या आहेत. त्यासाठी त्याने 37 चेंडूत खेळले. डेव्हिड बेडिंगहॅम 8 धावा काढून त्याच्यासोबत खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने आतापर्यंत 2 विकेट घेतले आहेत, तर जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
#MitchellStarc strikes in the very first over! How often have we seen that? 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) June 11, 2025
The defending champions are up and roaring as #AidenMarkram departs without scoring! 💪🏻
LIVE NOW 👉 https://t.co/9lZGHcdeVP #WTCFinal | #SAvAUS, Day 1, watch LIVE on Star Sports 1, Star Sports 1… pic.twitter.com/rZ74sbO1Hq
हे ही वाचा -





















