एक्स्प्लोर
एक लाख रुपयांचा आयफोन X किती रुपयात तयार झाला?
भारतात आयफोन X च्या 64GB व्हेरिएंटची किंमत 89 हजार रुपये आहे. हा फोन तयार करण्यासाठी कंपनीला 377 डॉलर (जवळपास 23 हजार 200 रुपये) खर्च आला.
नवी दिल्ली : आयफोन X हा अॅपलचा सर्वात महागडा फोन आहे. आयफोन X तयार करण्यासाठी आयफोन 8 च्या तुलनेत 25 टक्के अधिक खर्च आला आहे. मात्र या फोनची किंमत आयफोन 8 च्या तुलनेत 43 टक्के जास्त आहे, असं रॉयटरने दिलेल्या वृत्तात विश्लेषकांनी म्हटलं आहे.
भारतात आयफोन X च्या 64GB व्हेरिएंटची किंमत 89 हजार रुपये आहे. हा फोन तयार करण्यासाठी कंपनीला 377 डॉलर (जवळपास 23 हजार 200 रुपये) खर्च आला. अमेरिकेत या फोनची विक्री 999 डॉलर्समध्ये केली जाते. त्यामुळे कंपनीला एका फोनमागे 64 टक्के नफा होतो.
टेक इन्साइट्स ही कंपनी स्मार्टफोनची टियरडाउन किंमत सांगते. याच कंपनीने आयफोन X ची टियरडाउन किंमत सांगितली आहे. ज्यामध्ये कोणत्या पार्टसाठी किती पैसे लागले, याची माहिती देण्यात आली आहे.
आयफोन X मध्ये 5.8 इंच आकाराची OLED स्क्रीन वापरण्यात आली आहे, जो या फोनचा सर्वात महागडा पार्ट आहे. कंपनीने पहिल्यांदाच OLED स्क्रीन वापरली आहे. यासाठी कंपनीला 65 डॉलर म्हणजे जवळपास 4242 रुपये खर्च आला. आयफोन 8 मध्ये 4.7 इंच आकाराची एलसीडी स्क्रीन आहे, ज्यासाठी कंपनीला 36 डॉलर म्हणजे जवळपास 2300 रुपये खर्च आला.
आयफोन X मध्ये स्टेनलेस स्टीलची चेसिस देण्यात आली आहे. याच्या एका युनिटसाठी कंपनीला 36 डॉलर म्हणजे जवळपास 2300 रुपये खर्च आला. तर आयफोन 8 अॅल्युमिनिअमचा आहे, ज्यासाठी 21.50 डॉलर खर्च आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement