एक्स्प्लोर
मुंबई-पुणे अवघ्या 25 मिनिटात, सुपरसॉनिक ट्रेनसाठी सरकारकडे प्रस्ताव
मुंबई: मुंबईहून पुणे गाठण्यासाठी अवघी 25 मिनिटं देखील पुरेशी ठरु शकतात. नव्या हायपरलूप अत्याधुनिक परिवहन प्रणालीच्या साह्याने मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या 25 मिनिटात कापता येऊ शकतं.
अमेरिकन कंपनी हायपरलूपनं आपल्या या नव्या प्रोजेक्टसाठी दळणवळण खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रोजेक्ट सुरु करता यावा यासाठी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असून त्यासंबंधी प्रस्तावही दिला आहे.
या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यास पुढील 38 महिन्यात ही वेगवान व्हॅक्यूम ट्यूबमधील रेल्वे धावू शकेल असा अंदाज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ही वेगवान रेल्वे 1300 किमी प्रतितास वेगानं धावणार आहे. दरम्यान, याच्या 1 किमी ट्रॅकसाठी तब्बल 4 कोटी डॉलर खर्च अपेक्षित आहे.
काय आहे हायपरलूप सूपरसॉनिक तंत्रज्ञान?
हायपरलूप या सुपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अवघ्या 1.1 सेकंदात 186 किलोमीटरचा वेग गाठता येणार आहे.
या तंत्रज्ञानाने 1 तासात जवळपास 1 हजार किलोमीटरचं अंतर सहजपणे कापता येणार आहे.
दोन शहरांमध्ये ट्यूब टाकून त्यातून ही ट्रेन हवेवर तरंगत ट्यूबच्या पोकळीतून प्रवास करणार आहे.
ट्यूबमधल्या या ट्रेनवर विपरित हवामानाचा कोणताही परिणाम न होता हा प्रवास करता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement