एक्स्प्लोर
अवघ्या 9 मिनिटात 'या' स्मार्टफोनच्या तब्बल 50 हजार युनिटची विक्री
अवघ्या 9 मिनिटात ऑनर 9 लाईट स्मार्टफोनच्या तब्बल 50,000 युनिटची विक्री झाली आहे. हुवाईचा असा दावा आहे की, प्रत्येक सेकंदाला 150 युनिटची विक्री करण्यात आली.
मुंबई : हुवाईचा सब-ब्रॅण्ड ऑनरने आपला नवा स्मार्टफोन ऑनर 9 लाइट मागील आठवड्यात भारतात लाँच केला होता. त्यानंतर आता या बजेट स्मार्टफोनने एक मोठा विक्रम केला आहे.
अवघ्या 9 मिनिटात ऑनर 9 लाईट स्मार्टफोनच्या तब्बल 50,000 युनिटची विक्री झाली आहे. हुवाईचा असा दावा आहे की, प्रत्येक सेकंदाला 150 युनिटची विक्री करण्यात आली. हुवाईचा असाही दावा आहे की, ऑनर 9 लाइट हा फ्लिपकार्टवरील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.
ऑनर 9 लाइट स्मार्टफोनचे खास फीचर :
ऑनर 9 लाइटमध्ये 5.6 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचे रेझ्युलेशन 2160x1080 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये 659 प्रोसेसर देण्यात आलं असून 3 जीबी आणि 4 जीबी मेमरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये तब्बल 4 कॅमेरा देण्यात आले आहेत. यामध्ये रिअर आणि फ्रंट ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. रिअर आणि फ्रंट कॅमेरामध्ये प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सल आणि सेकेंडरी कॅमेरा लेन्स 2 मेगापिक्सल आहे.
ऑनर 9 लाइटमध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉईड ओरिओ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. तसेच यामध्ये बॅक पॅनलवर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement