एक्स्प्लोर
एचटीसीचा भारतात ग्रँड इव्हेंट, 'डिझायर 10 प्रो' लॉन्च होणार?
मुंबई : एचीटीसी कंपनीने भारतात आपल्या 'डिझायर 10 प्रो' स्मार्टफोनच्या लॉन्चिगची तयारी सुरु केली आहे. येत्या 24 नोव्हेंबरला दिल्लीत एचटीसीचं इव्हेंट आहे. याच इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनचं लॉन्चिग करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
एचटीसी साऊंड आणि लेटेस्ट इनोव्हेशनची माहिती या इव्हेंटमध्ये देणार असल्याचे माध्यमांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे. मात्र, याच इव्हेंटमध्ये एचटीसी डिझायर 10 प्रो स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
'एचटीसी डिझायर 10 प्रो'चे फीचर्स -
- 5.5 इंचाचा (1920 x 1080 पिक्सेल) रिझॉल्युशन
- आयपीएस डिस्प्ले
- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
- 4000 पीपीआय स्क्रीन डेन्सिटी
- 1.8 गीगाहर्ट्झ ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी 10 प्रोसेसर
- 550 मेगाहर्ट्झ माली टी 860 जीपीयू
- 4 जीबी रॅम
- 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट
- 2 टीबीपर्यंत मायक्रोएसडीच्या सहाय्याने स्टोरेज वाढवता येणार
- 20 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (ड्युअल एलईडी फ्लॅश, लेझर ऑटोफोकस, अपॅर्चपर, एफ/2.2)
- 13 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- फिंगरप्रिंट सेन्सर
- एचटीसी बूमसाऊंड टेक्नॉलॉजी
- 3000 mAh बॅटरी क्षमता
एचटीसीचा 'डिझायर 10 प्रो' स्टोन ब्लॅक आणि पोलर व्हाईट कलरमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची किंमत गुरुवारी लॉन्चिंग इव्हेंटमध्येच जाहीर केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement