एक्स्प्लोर
एचटीसीचा मोस्ट अवेटेड HTC 10 स्मार्टफोन लॉन्च
मुंबई : तैवानमधील प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी एचटीसीने आपला 2016 मधील सर्वात शानदार स्मार्टफोन HTC 10 लॉन्च केला आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 52 हजार 990 रुपये असून, 5 जूनपासून या स्मार्टफोनची शिपिंग सुरु करण्यात आली आहे. पहिल्या 500 ग्राहकांना कंपनीकडून आयएस व्ह्यू केस देण्यात येणार आहे.
HTC 10 स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाचा डिस्प्ले, 2K रिझॉल्युशन सपोर्ट असेल. एल्युमिनिअम यूनि बॉडीचं डिझाईन या स्मार्टफोनचं विशेष आकर्षण ठरतं. यामध्ये लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 2.2 GHz प्रोसेसर आहे. 4 जीबी रॅमसोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 2 टीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे.
याचसोबत दुसरं व्हेरिएंट HTC 10 लाईफस्टाईललाही लॉन्च केलं जाऊ शकतं, ज्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आहे. म्युझिक लव्हर्ससाठी यामध्ये बूमसाऊंड डॉल्बी सराऊंडचा वापर करण्यात आला आहे, ज्याची क्वालिटी उत्कृष्ट मानली जाते.
HTC 10 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रापिक्सेल तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला असून, यामध्ये 12 अल्ट्रापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामध्ये 4K रिझॉल्युशन रेकॉर्डिंग करु शकता. HTC 10 अँड्रॉईड 6 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतं.
यामध्ये 3000mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी देण्यात आली असून क्विक चार्जिंगला सपोर्ट करते. 30 मिनिटात 50 टक्के बॅटरी चार्ज होते, जी 27 तासांपर्यंत टॉकटाईम देते.
कनेक्टिव्हिटीमध्ये ब्लूटूथ 4.0, वाय-फाय 802.11 असून, फिंगरप्रिंट स्कॅनरचीही सुविधा देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement