एक्स्प्लोर

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?

नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व आर्थिक व्यवहार नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, स्वाईप मशिन, चेक यांद्वारे होणार आहेत.

मुंबई : नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व आर्थिक व्यवहार नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, स्वाईप मशिन, चेक यांद्वारे होणार आहेत. दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्यासाठी नेट बँकिंग हा एक उत्तम मार्ग आहे. याद्वारे मोबाईल, डीटीएच रिचार्ज, वीज बिल, गॅस बिल, म्युच्युअल फंड किंवा पैसे ट्रान्सफर करणं अगदी सोपं आहे. जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्राहकांना नेट बँकिंग सुविधा उपलब्ध आहे. net-banking-7 नेट बँकिंग कसं सुरु कराल? उदाहरणार्थ एचडीएफसीच्या ग्राहकांना कुणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तात्काळ कॅशलेस व्यवहार करता येऊ शकतील. सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्याचा हा मार्ग आहे. त्यासाठी नेट बँकिंग सुरु केलंलं असणं गरजेचं आहे. बँकेमध्ये ग्राहकांना एक फॉर्म भरुन नेट बँकिंग सुरु करुन दिलं जातं. त्यानंतर एक कस्टमर आयडी आणि आयपीन दिला जातो. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल? पैसे ट्रान्सफर कसे कराल? कस्टमर आयडी आणि आयपिन मिळाल्यानंतर आयएचडीएफसी बँकेच्या नेट बँकिंग (https://www.hdfcbank.com/assets/popuppages/netbanking.htm) या पेजवर जावं. तिथे पहिल्यांदा कस्टमर आयडी टाकण्याचा पर्याय येईल. कस्टमर आयडी टाकल्यानंतर आयपिन टाकण्याचा पर्याय येईल. लॉग ईन केल्यानंतर पहिल्यांदा खात्याचा तपशील दाखवला जाईल. बाजूलाच फंड ट्रान्सफर हा पर्याय दिलेला आहे. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांच्या बँकेचा आयएफएससी कोड, बँक खाते नंबर आवश्यक आहे. net-banking-2 पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अगोदर बेनिफिशिअरी क्रमांक म्हणजे ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांचा तपशील तयार करणं गरजेचं आहे. फंड ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर बाजूलाच रिक्वेस्ट हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अॅड बेनिफिशिअरी हा पर्याय दिसेल. त्यामध्ये ज्यांना पैसे पाठवायचे त्यांचा आयएफएससी कोड, खाते क्रमांक ही माहिती दिल्यानंतर पुढील स्टेपमध्ये जावं. net-banking-3 खाते क्रमांक, आयएफएससी कोड टाकून पुढे गेल्यानंतर कंफर्म करण्यापूर्वी तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून बेनिफिशिअरी तयार करावं. बेनिफिशिअरी तयार केल्यानंतर सरासरी 30 मिनिटांनंतर तुम्ही पैसे पाठवू शकता. 30 मिनिटांनंतर एचडीएफसी ते एचडीएफसी किंवा इतर बँकांना पैसे पाठवता येतील. एचडीएफसीच्याच ग्राहकाला पैसे पाठवायचे असतील तर 'ट्रान्सफर विथिन बँक' हा पर्याय निवडावा किंवा इतर बँकेच्या ग्राहकाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर 'ट्रान्सफर टू ऑदर बँक' हा पर्याय निवडावा. net-banking-4 एचडीएफसीच्या ग्राहकालाच पैसे पाठवायचे असतील तर तीन स्टेपमध्ये पैसे पाठवता येतात. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला सेव्हिंग किंवा करंट अकाऊंटमधून पैसे पाठवायचे आहेत, तो पर्याय निवडावा. त्यानंतर 'ट्रान्सफर नाऊ' हा पर्याय निवडूण तुम्ही अॅड केलेल्या बेनिफिशिअरीचा क्रमांक निवडावा. net-banking-5 जेवढे पैसे पाठवायचे आहेत ती रक्कम टाकावी. त्यानतंर कंफर्म करावं. कंफर्म केल्यानंतर तुम्हाला खात्याशी कनेक्टेड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानतंर काही क्षणात पैस ट्रान्सफर होतील. नेट बँकिंगच्या मर्यादा नेट बँकिंग हा बँकेकडून ग्राहकाला दिलेला आर्थिक व्यवहाराचा कॅशलेस पर्याय आहे. यामुळे कसलाही व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. एका दिवसात एचडीएफसी किंवा कोणत्याही बँकेच्या ग्राहकाला एक रुपयापासून ते 10 लाखापर्यंत पैसे पाठवता येऊ शकतात. यासाठी कोणताही अधिकचा कर लागत नाही. नोटाबंदीनंतर नेट बँकिंगचा वापर जवळपास 200 टक्क्यांनी वाढल्याचं बोललं जात आहे. नेट बँकिंग प्रक्रिया सर्व बँकांची थोड्या फार फरकाने सारखीच आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivajirao Kardile Passes Away: दूध व्यवसाय, मंडळाचा कार्यकर्ता, सरपंच ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
दूध व्यवसाय, मंडळाचा कार्यकर्ता, सरपंच ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
Solapur Politics: सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
Afg vs Ban : बांगलादेशी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला, लाजिरवाण्या पराभवानंतर एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? क्रिकेटरने सांगितला थरारक प्रसंग
बांगलादेशी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला, लाजिरवाण्या पराभवानंतर एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? क्रिकेटरने सांगितला थरारक प्रसंग
Rohit Sharma & Gautam Gambhir: एकमेकांशी हात मिळवला, खांद्यावर हात टाकून गप्पा, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरचे पर्थच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल
एकमेकांशी हात मिळवला, खांद्यावर हात टाकून गप्पा, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरचे पर्थच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: सोलापुरात राजकीय भूकंप, 4 माजी आमदार भाजपच्या वाटेवर
Anil Pawar ED Case:अनिल पवारांची अटक बेकायदेशीर ठरवण्याला ईडीचे सुप्रीम कोर्टात आव्हान
Chandrashekhar Bawankule : महसूल अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, 23 अधिकाऱ्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा
Pune News : पुण्यात दिवाळीपूर्वी मोठी कारवाई, 2 कोटींचे भेसळयुक्त पदार्थ जप्त
Solapur Politics: सोलापूरमध्ये भाजपची मेगा भरती, चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivajirao Kardile Passes Away: दूध व्यवसाय, मंडळाचा कार्यकर्ता, सरपंच ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
दूध व्यवसाय, मंडळाचा कार्यकर्ता, सरपंच ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
Solapur Politics: सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
Afg vs Ban : बांगलादेशी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला, लाजिरवाण्या पराभवानंतर एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? क्रिकेटरने सांगितला थरारक प्रसंग
बांगलादेशी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला, लाजिरवाण्या पराभवानंतर एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? क्रिकेटरने सांगितला थरारक प्रसंग
Rohit Sharma & Gautam Gambhir: एकमेकांशी हात मिळवला, खांद्यावर हात टाकून गप्पा, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरचे पर्थच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल
एकमेकांशी हात मिळवला, खांद्यावर हात टाकून गप्पा, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरचे पर्थच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल
Test Twenty in Cricket : मोठी घोषणा! कसोटी, वनडे अन् टी-20नंतर क्रिकेटमध्ये नवा फॉर्मेट ‘टेस्ट ट्वेंटी’ लॉन्च, किती ओव्हरची मॅच होणार?
मोठी घोषणा! कसोटी, वनडे अन् टी-20नंतर क्रिकेटमध्ये नवा फॉर्मेट ‘टेस्ट ट्वेंटी’ लॉन्च, किती ओव्हरची मॅच होणार?
Nilesh Ghaywal: निलेश घायवळभोवतीचा फास पुणे पोलिसांनी आवळला, मुलाच्या परदेशी शिक्षणाच्या पैशांचा माग काढणार, आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
निलेश घायवळभोवतीचा फास पुणे पोलिसांनी आवळला, मुलाच्या परदेशी शिक्षणाच्या पैशांचा माग काढणार, आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
Nestle Layoffs : टेक कंपन्यांनंतर आता नेस्लेकडून कर्मचारी कपातीचं नियोजन, 16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
नवीन सीईओ येताच नेस्लेचं मोठं प्लॅनिंग,16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, अपडेट समोर 
Rise and Fall Winner: अरबाज पटेल की अर्जुन बिजलानी,  कोणत्या कंटेस्टेंटनं जिंकला 'राइज एंड फॉल'चा खिताब?
अरबाज पटेल की अर्जुन बिजलानी, कोणत्या कंटेस्टेंटनं जिंकला 'राइज एंड फॉल'चा खिताब?
Embed widget