एक्स्प्लोर

Honor ने भारतातून गुंडाळला गाशा! जाणून घ्या काय आहे कारण

Honor Smartphone: चिनी कंपनी Honor ने भारतातून काढता पाय घेतला आहे. Honor भारतीय बाजारातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या.

Honor Smartphone: चिनी कंपनी Honor ने भारतातून काढता पाय घेतला आहे. Honor भारतीय बाजारातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. अखेर या बातमीला कंपनीचे सीईओ झाओ मिंग (Zhao Ming) यांनी दुजोरा दिला आहे. झाओ मिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंपनीने अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, "भारतात अनेक वर्षे काम केल्यानंतर, Honor टीमने भारतीय बाजारात व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.''

Honor India चा शेवटचा ट्वीट

Honor India च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मार्च 2021 मध्ये होळीच्या सणावर शेवटचे ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर एकही ट्वीट करण्यात आलेले नाही. मिंगने कथितरित्या ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, बाजारात घसरण होत असतानाही Honor ने आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यांत देशात स्मार्टफोनसह स्मार्टवॉच, नोटबुक आणि बरेच काही लॉन्च केले आहे.

Honor ने आपले शेवटचे उत्पादन जून 2022 मध्ये भारतात लॉन्च केले होते. यामध्ये कंपनीने Honor Watch GS 3 लॉन्च केली. या स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंचाची AMOLED स्क्रीन आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एका चार्जवर 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. त्याच्या मिडनाईट ब्लॅक मॉडेलची किंमत 12,990 रुपये आहे. तर ब्लू आणि क्लासिक गोल्ड शेड्स मॉडेलची किंमत 14,990 रुपये आहे.

Honor X8 5G 

Huawei च्या सब-ब्रँड Honor ने Honor X8 5G ला जागतिक स्तरावर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 480+ प्रोसेसर दिला जाईल. यात 6 GB RAM आणि 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले असेल. या फोनमध्ये 48 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. याशिवाय 8 MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध असेल. आता कंपनीने आपला व्यवसाय भारतात बंद केला आहे. त्यामुळे हा फोन भारतात लॉन्च होणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget