एक्स्प्लोर

तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला

मुद्द्याची निवडणूक गुद्द्याकडे नेऊ नका. लोकशाहीच्या या उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर याद राखा, असा इशारा विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांना दिला.

Vijaysingh Pandit vs Yogesh Kshirsagar: बीड नगरपालिका निवडणुकीत योगेश क्षीरसागर विरुद्ध आमदार विजयसिंह पंडित संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांच्यावर जहरी टीका केली.  कार्यकर्त्यांची निवडणूक आली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळकुटेपणा केला. ही माझी निवडणूक नाही. मात्र, माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही, अशा चिल्या पिल्याने माझ्यावर आरोप करू नये, असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. 

दुसऱ्यांचे वासे मोजण्याचा प्रयत्न करण्याचे तुमचे वय नाही

विजयसिंह पंडित म्हणाले की, बारामतीला जेवढे पैसे दिले नाही तेवढा निधी बीड नगरपालिकेला दिला असं पवार कुटुंब नेहमी सांगतं. मात्र, तो निधी गेला कुठे? हे तुम्ही सांगा. मागे काय दिवे लावले ते लोकांना सांगा असं थेट आव्हान जाहीर सभेतून पंडित यांनी क्षीरसागर यांना दिलं. नियतीने तुमची काय अवस्था केली ते आधी पहा. नियतीचा खेळ असतो. दुसऱ्यांचे वासे मोजण्याचा प्रयत्न करण्याचे तुमचे वय नाही. मुद्द्याची निवडणूक गुद्द्याकडे नेऊ नका. लोकशाहीच्या या उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर याद राखा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार आहेत, असा इशारा पंडित यांनी क्षीरसागर यांना दिला. 

अनेक दशके एकाच कुटुंबाकडे बीड नगरपालिका

त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत ज्याला पक्षाने संधी दिली होती, त्याने एकही निवडणूक लढवली नव्हती.  नऊ वर्षांपूर्वी नगरपालिका निवडणुकीत तीन प्रभागातून त्यांनी नामांकन दाखल केले आणि तीनही ठिकाणाहून त्यांचा अर्ज उडाला. अशा उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, कार्यकर्त्यांची निवडणूक आली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळकुटेपणा केला. मी 25 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत आलो आहे. घराचं नाव घेऊन पुढे आलो नाही, माझी ओळख घेऊन इथं आलो आहे. गेली अनेक दशके एकाच कुटुंबाकडे बीड नगरपालिका होती. अजितदादांनी या नगरपालिकेचे पालकत्व स्वीकारले असून या शहराला दत्तक घेण्याचे ठरवलं आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Embed widget