ZP Election : झेडपी निवडणुकांचा मुहूर्त पुन्हा चुकणार? Special Report
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा पुढे जाण्याची शक्यता निर्माण झालीय... कारण सुप्रीम कोर्टानं तसा इशाराच दिलाय.. आता मंगळवारी सुप्रीम कोर्टात निवडणुकीबाबत सुनावणी पार पडणार आहे.. त्या सुनावणीत काय निर्णय होणार यावर निवडणुकीचं पुढील भवितव्य अवलंबून आहे...
१ गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मुहूत पुन्हा हुकण्याची शक्यता आहे.. त्याला कारण ठरलं आरक्षणाच्या मर्यादेचं.... राज्यातील ३४ पैकी २० जिल्हा परिषदेत ५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली... त्यामुळे सुप्रीम कोर्टानं त्याची गंभीर दखल घेत निवडणुका स्थगिती द्यावा लागणार असल्याचा इशारा दिलाय... तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलंय..
एकीकडे अजित पवारांनी निवडणुकीबाबत रोखठोक मत व्यक्त केलं तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर सावध भूमिका व्यक्त करत निवडणूक आयोगच योग्य निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.
3 जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि काही महापालिकांमधील आरक्षण 50 टक्क्यांच्यावर गेल्याची माहिती आहे. त्यावर येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार यावर निवडणुकींचं भवितव्य अवलंबून आहे.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























