एक्स्प्लोर
भारतीयांचा सर्वात जास्त विश्वास गुगलवर
सोनी, यूट्यूब, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंज आणि ब्रिटिश एअरवेज पहिल्या 10 विश्वसनीय ब्रँडच्या यादीत आहेत.
मुंबई : गुगल कंपनी भारतीयांचा सर्वात विश्वासू ब्रँड म्हणून समोर आली आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, मारुती सुझुकी आणि अॅपलला भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
न्यूयॉर्क येथील कॉन अँड वोल्फ या कंपनीच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली. सोनी, यूट्यूब, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंज आणि ब्रिटिश एअरवेज पहिल्या 10 विश्वसनीय ब्रँडच्या यादीत आहेत, असं सर्वेक्षणात म्हटलं आहे.
दरम्यान जागतिक स्तरावर अमेझॉन सर्वात विश्वनीय ब्रँड असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि पेपल यांचा क्रमांक लागतो.
भारतीय ग्राहक आता ब्रँडच्या विश्वासार्हतेवर आधारित मत तयार करण्याच्या बाबतीत अधिक सकारात्मक झाले आहेत. 67 टक्के भारतीय विश्वासार्ह ब्रँडची खरेदी करणं पसंत करतात. हे ब्रँड प्रामाणिकपणा जपतात आणि जबाबदारी स्विकारतात, असं 38 टक्के ग्राहकांचं म्हणणं आहे. तर जागतिक स्तरावर सरासरी 25 टक्के ग्राहकांचं हे मत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement