एक्स्प्लोर
Advertisement
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना 'गूगल'चं डूडलमधून अभिवादन!
मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 186वी जयंती आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त 'गूगल'नं देखील डूडलच्या माध्यमातून सावित्रीबाईंना अभिवादन केलं आहे.
सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे आणि ही गरज ओळखूनच त्यांनी तात्कालिन समाजाच्या रुढी-परंपरा झुगारुन महिलांसाठी शिक्षणाची सुरुवात केली. जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनीही मोलाची भूमिका बजावली होती.
गूगल आपल्या डूडलच्या माध्यमातून अनेकांना अभिवादन करतं. ज्यांनी समाजासाठी आयुष्य वेचलं अशा लोकांचा गूगल आपल्या डूडलमध्ये त्यांना स्थान देतं. मुलींच्या शिक्षणासाठी अव्याहत झटणाऱ्या या तपस्वीला आज गूगलनं देखील आपल्या डूडलच्या माध्यमातून खास मानवंदना दिली आहे.
सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement