(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google Doodle : गुगलचं खास डूडल; ब्रह्मांडाचे फोटो अन् जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, काय आहे खास?
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून (James Webb Space Telescope) काढण्यात आलेल्या फोटोंचे गुगलनं एक खास डूडल तयार केलं आहे.
Google Doodle : नासाने (NASA) सर्वात शक्तिशाली असलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून (James Webb Space Telescope) काढण्यात आलेले ब्रह्मांडाचे नवीन रंगीत फोटो जारी केले आहेत. हे फोटो अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी शेअर केले होते. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून (James Webb Space Telescope) काढण्यात आलेल्या फोटोंचे गुगलनं एक खास डूडल तयार केलं आहे.
काय आहे खास?
जेम्स वेब टेलिस्कोपमधून काढण्यात आलेले ब्रह्मांडाचे फोटो तुम्ही या डूडलमध्ये पाहू शकता. गुगलच्या डूडलमध्ये तुम्ही जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप हे एनिमेटेड स्वरुपात आहे. या गुगल डूडलमध्ये जेम्स वेब टेलिस्कोपमधून काढण्यात आलेले पाच फोटो दिसत आहेत. गुगल डूडलमध्ये एनिमेटेड टेलिस्कोपच्या हातात कॅमेरा देखील दिसत आहे. गुगलनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील हे डूडल शेअर केलं आहे. हे डूडल शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'विश्वात आपण एकटे आहोत का? आपण इथे कसे पोहोचलो? जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं काढलेले ब्रह्मांडाचे फोटो तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देतील. आज गुगल डूडल जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं काढलेल्या ब्रह्मांडाच्या फोटोंना सेलिब्रेट करत आहे.'
पाहा डूडल:
Are we alone in the universe? How’d we get here?
— Google Doodles (@GoogleDoodles) July 12, 2022
The first images from the James Webb Space Telescope help us #UnfoldTheUniverse & answer the questions above 🌌
Today’s #GoogleDoodle celebrates the deepest infrared photo of the universe ever taken → https://t.co/pMopFK62KE pic.twitter.com/CIuvEiBT1z
जेम्स वेब टेलिस्कोपनं काढलेले फोटो हे ब्रह्मांडाचे पहिले हाय-रिझोल्यूशन आणि रंगीत फोटो आहेत. यामधील एक फोटो हा जो बाडन यांनी ट्विटरवर शेअर केला होता. 'स्पेस टेलिस्कोपमधील हा पहिला फोटो विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील एक ऐतिहासिक क्षण दर्शवतो. हा खगोलशास्त्र, अवकाश संशोधनासाठी ऐतिहासिक क्षण आहे. तसेच हे अमेरिकेसाठी आणि संपूर्ण मानवतेसाठी आहे. ' असं कॅप्शन जो बाडन यांनी या फोटोला दिलं आहे. कमला हॅरिस यांनी एका कार्यक्रमात ब्रह्मांडाच्या या रंगीत फोटोंबाबत सांगितलं की, 'हा क्षण आपल्यासाठी खास आहे. आजचा दिवस विश्वासाठी एक रोमांचक आणि नवा अध्याय सुरु करणारा आहे.'
हेही वाचा: