एक्स्प्लोर
पुण्यातील GMRT दुर्बिणीचं यश, मंगळावरचा संदेश टिपला!
पुणे : युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) रोव्हरने मंगळावरून पाठवलेला रेडिओ संदेश पुण्याच्या रेडिओ टेलिस्कोपनं म्हणजे जीएमआरटीनं टिपला आहे. जीएमआरटी म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप. पुण्यातील नारायणगावजवळ खोडद येथे जीएमआरटी आहे.
ईएसएचं यान आज मंगळाभोवती कक्षेत प्रस्थापित करण्यात आलं. या यानानं छोटा रोव्हर मंगळावर उतरवण्याचा प्रयत्न केला. या महत्त्वाच्या टप्प्यावर रोव्हरचा पृथ्वीशी संपर्काचा मार्ग म्हणून जीएमआरटीची भूमिका महत्त्वाची ठरली. रोव्हर मंगळावर उतरताना त्यानं पाठवलेला पहिला रेडिओ संदेश जीएमआरटीनेच टिपला.
जीएमआरटी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणींपैकी एक आहे. नासा, इस्रो यांसारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांनी याआधीही अनेकदा या दुर्बिणीची मदत घेतली होती.
गेल्यावर्षी नासाने अंतराळात मंगळावर सोडलेल्या 'MARS ROVER'चं नियंत्रण, संदेश देवाण-घेवाण तसेच संयमन हे जीएमआरटीनंच केलं होतं. आता युरोपियन स्पेस एजन्सीनेही जीएमआरटीची मदत घेतली आहे. या मोहिमेला सहाय्य करण्यासाठी नासाचे वैज्ञानिक स्टीफन इस्टरहुईझेन, जीएमआरटीचे निर्देशक प्रो. स्वर्णकांती घोष, जीएमआरटीचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता हे खोडदमधे आले आहेत.
दरम्यान, जीएमआरटी उद्या साडेचार वाजता पुण्यातील आयुकामध्ये मार्सरोव्हरकडून आलेल्या संदेशांची माहिती देणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement