एक्स्प्लोर
Advertisement
फ्रिचार्ज युझर्सच्या ई-वॉलेटला आता विम्याचं कवच
नवी दिल्ली : फ्रिचार्ज या डिजिटल पेमेंट कंपनीने ग्राहकांना एक दिलासादायक सेवा दिली आहे. जर एखाद्या युझर्सचा मोबाईल हरवला तर ई-वॉलेटमध्ये उपलब्ध असलेल्या 20 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी मोफत विमा उपलब्ध करुण दण्यात येणार आहे.
फ्रिचार्जने रिलायन्ससोबत करार करुन ग्राहकांना मोफत विमा सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल हरवल्यास वॉलेटमधील पैसाही परत मिळत नाही, ही युझर्सची मोठी समस्या होती, त्याचाच विचार करत ही सेवा सुरु केली, असं फ्रिचार्जने म्हटलं आहे.
असा मिळवा विमा
युझर्सचा फोन चोरी किंवा हरवल्यास 24 तासांच्या आत स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल. सोबतच याची माहिती फ्रिचार्जला ई-मेल करुन किंवा कस्टमर केअरला द्यावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement