एक्स्प्लोर
Facebook Down : जगभरात फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत
जगभरात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. फेसबुक वापरताना अडचणी येत असल्याने युजर्सनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली.
![Facebook Down : जगभरात फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत Facebook, Instagram have been down for hours Facebook Down : जगभरात फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/29144819/Facebook-Reactions-7-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फेसबुक - चीनने जुलै 2009 मध्ये फेसबुकवर बंदी आणली आहे. शिवाय, चीन पुन्हा फेसबुक सुरु करेल, अशी आशाही व्यक्त केली जात नाही. स्वत: मार्क झुकरबर्ग अनेकदा चीनमध्ये गेले आहेत, शी जिनपिंग यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र तरीही अद्याप चीनमध्ये फेसबुक सुरु करण्यात आले आहे.
मुंबई : जगभरात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे. फेसबुक वापरताना अडचणी येत असल्याने युजर्सनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली.
काल (बुधवार) संध्याकाळी फेसबुकची सेवा विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. जगभरातील अनेक युजर्सना फेसबुक लॉगिन करताना तसेच फेसबुकवर पोस्ट करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. 'Facebook is Down for required maintenance' असं नोटिफिकेशन लॉगिन करताना दिसत होते. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना युजर्सला अडचणी येत होत्या. आज(गुरुवार) सकाळी देखील अनेक युजर्सनी फेसबुक, इन्स्टाग्राम सोबत व्हॉट्सअॅपची सेवाही विस्कळीत झाल्याची तक्रार ट्विटरवर केली आहे. ट्विटरवर #FacebookDown, #instagramdown हॅशटॅग सध्या ट्रेण्डिंग आहेत.
बुधवारी सकाळी गुगल ड्राईव्ह आणि यूट्युबची सेवा देखील काही काळासाठी विस्कळीत झाली होती. जगभरात अनेकांना गुगल ड्राइव्ह आणि युट्यूबवर फाईल्स, व्हिडीओ अपलोड करताना अडचणी येत होत्या.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)