एक्स्प्लोर

Elon Musk : मला आवडतं, जेव्हा लोक ट्विटरवरच ट्विटरची तक्रार करतात; मालक एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया

Elon Musk on Twitter : ट्विटरचं ( Twitter ) पाखरू एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्या हाती आल्यापासून मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

Elon Musk Tweet : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटर कंपनी ( Twitter Deal ) खरेदी केली. ट्विटरचं ( Twitter )  पाखरू एलॉन मस्क यांच्या हाती आल्यापासून मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. कंपनीमधून मोठ्या प्रमाणात नोकर कपात ( Twitter Layoffs ), ब्लू टिकसाठी शुल्क ( Twitter Blue Tick Paid Subscription ) हे यातील काही महत्त्वाचे निर्णय आहेत. या निर्णयांमुळे मस्क यांच्यावर नेटकरी प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ट्विटर युजर्सने ट्विट करत मस्क यांनी केलेल्या बदलाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावर मस्क यांनी आता ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'मला आवडतं, जेव्हा लोक ट्विटरवरच ट्विटरची तक्रार करतात.'

 ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी अनेक नवे नियम लागू केले आहेत. याचा परिणाम लाखो ट्विटर युजर्सवर होत आहे. परिणाम ट्विटर युजर्स ट्विटरवर आपली प्रतिक्रिया मांडत रोष व्यक्त करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी म्हटलं आहे की, जेव्हा लोक ट्विटरवर ट्विटरची तक्रार करतात, ते मला आवडतं.

इतकंच नाही तर मस्क यांनी त्यांच्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल करत स्वत:ला ट्विटर तक्रार हॉटलाइन ऑपरेटर ( Twitter Complaint Hotline Operator ) म्हटलं आहे.
Elon Musk : मला आवडतं, जेव्हा लोक ट्विटरवरच ट्विटरची तक्रार करतात; मालक एलॉन मस्क यांची प्रतिक्रिया

'ट्विटर कंपनी येत्या काळात अनेक गोष्टी करेल'

ट्विटर करार पूर्ण झाल्यापासून एलॉन मस्क दररोज नवनवीन निर्णय लागू करत आहेत. बुधवारी मस्क यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे की, 'ट्विटर कंपनी येत्या काही महिन्यांत ट्रायल-एंड-एररच्या आधारावर अनेक गोष्टी करेल.' एलॉन मस्क याधी नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे चर्चेत असायचे. आता ट्विटर खरेदी केल्यावर त्यांची ट्विट अधिकच व्हायरल होतात.

मस्क यांनी ट्विट करत काय सांगितलं?

मस्क यांनी ट्विट करत कंपनीच्या आगामी योजनेबाबत सांगितलं आहे. कंपनीकडून येत्या काळात अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे कंपनीकडून विविध योजनांवर आणि फिचरवर काम सुरु आहे. याबाबत ट्विट करत एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे की, 'कृपया लक्ष द्या! येत्या काही महिन्यांमध्ये कंपनी अनेक मूर्खपणाच्या गोष्टी करणार आहे. त्यातील ज्या गोष्टी योग्य प्रकारे काम करतील त्यांचा वापर करण्यात येईल आणि इतर गोष्टींमध्ये बदल करण्यात येईल.'

ब्लू टिकसाठी दरमहा आठ डॉलर

एलॉन मस्क यांनी अलिकडे ट्विटरवर पेड ब्लू सबस्क्रिप्शन सुरु केलं आहे. त्यासाठी युजरला दरमहा आठ डॉलर शुल्क भरावं लागेल. भारतातही नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत ही सेवा चालू होऊ शकते. मात्र, पेड ब्लू टिकच्या निर्णयावर नेटकरी नाराज आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
Vijay Shivtare on Baramati : विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Arvind Kejriwal  : अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यास कोर्टाचा नकार : ABP MajhaUdhhav Thackray And Sharad Pawar : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या लवकरच महाराष्ट्रात संयुक्त सभाArjun Khotkar On Loksabha 2024 : भाजपच्या जागा आम्ही मागितल्या का?, खोतकरांचा संतप्त सवालABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 PM :  28 March 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
Vijay Shivtare on Baramati : विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Sanjay Raut : पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha
मोठी बातमी : सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार
मोठी बातमी : सकल मराठा समाजाने शड्डू ठोकला! नाशकात छगन भुजबळांविरोधात देणार उमेदवार
Embed widget