Twitter Official Label : ट्विटरवर नवीन 'Official' लेबल, काही वेळानंतर हटवला, काय आहे कारण?
Twitter Official Label : ट्विटरने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सह अनेकांच्या ट्विटर अकाऊंटला ऑफिशिअल' लेबल दिलं होते. मात्र काही वेळानंतर ते हटवण्यात आलं.
Twitter Official Label : ट्विटरने काही व्हेरिफाईड अकाऊंट्सला 'ऑफिशिअल' लेबल ( Official Label ) दिलं होतं. मात्र काही काळानंतर हा ऑफिशिअल लेबल काढून टाकण्यात आला. ट्विटरने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) , गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, राहुल गांधी आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींच्या व्हेरिफाईड ट्विटर हँडलवर ( Verified Accounts ) ऑफिशिअल लेबल ( Official Label ) दिला होता. मात्र त्यानंतर काही काळानंतर हा ऑफिशिअल लेबल हटवण्यात आला.
ब्लू टिक आणि व्हेरिफाईड अकाऊंटमधील फरक ओळखण्यासाठी नवीन फिचर
ट्विटरवर नवीन फिचर आणण्याची तयारी सुरु आहे. ट्विटर कंपनीकडून ट्विटर ब्लू टिक अकाऊंट ( Tweeter Blue Tick ) आणि व्हेरिफाईड अकाऊंट ( Verified Accounts ) यांच्यातील फरक ओळखण्यासाठी नवीन फिचर आणणार आहे. या नवीन फिचरमुळे ऑफिशिअल आणि व्हेरिफाईट अकाऊंट यांच्यातील फरक ओळखता येईल. त्यासाठी ट्विटरकडून सध्या चाचणी सुरु आहे.
ट्विटर नवीन फिचर आणण्याच्या तयारीत
ट्विटरकडून नवीन ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरु करण्यात आलं आहे. यानुसार, ट्विटर युजर्सना ब्लू टिकसाठी शुल्क भरावं लागणार आहे. ब्लू टिकसाठी ट्विटरकडून दरमहा आठ डॉलर शुल्क आकारलं जाईल. त्यामुळे ट्विटर आता ब्लू टिक अकाऊंट आणि व्हेरिफाईड अकाऊंट यांच्यातील फरक ओळखण्यासाठी नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे.
Official Label बाबत अधिकृत माहिती नाही
ट्विटरच्या ब्लू टिक सब्सक्रिप्शननंतर कंपनी या ग्रे लेबलची चाचणी करत आहे. ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंटच्या खाली राखाडी रंगामध्ये अधिकृत ट्विटर हँडल ( Verified Twitter Account ) असा लेबल दिसत होता. हा ऑफिशिअल लेबल काही काळानंर हटवण्यात आला. अद्याप कंपनीकडून हे नवीन ऑफिशअल लेबल फिचर अधिकृतपणे लाँच करण्यात आलेलं नाहीय तोपर्यंत याबाबत अधिक काहीही सांगता येणार नाही. सध्या ट्विटर कंपनी किंवा नवे मालक एलॉन मस्क यांनी या फिचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. येत्या काळात याबाबत अधिक माहिती समोर येईल.
आधीच्या व्हेरिफाईड अकाऊंट्सना मिळणार ऑफिशिअल लेबल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटरवर ज्यांच्याकडे आधीच व्हेरिफाईड खाती आहेत, त्यांनाच राखाडी रंगात Official Label मिळेल. ट्विटरचे हे फिचर सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. याच चाचणी दरम्यान बुधवारी अनेक अकाऊंट्सवर हा टॅग दिसला होता, मात्र आता हा टॅग काढून टाकण्यात आला आहे.