एक्स्प्लोर
डॅट्सन रेडी गोचा धुमाकूळ, एका दिवसात तब्बल 310 कारची विक्री

तिरुवअनंतपुरम(केरळ): डॅट्सनच्या रेडी गो कारने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये एका दिवसात तब्बल 310 रेडी गो कारची विक्री झाली आहे. तर जवळपास 2 महिन्यांची वेटिंग आहे. या कारची आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त बुकिंग झाली आहे.
रेडी गोच्या टी, एस अशा सर्वच मॉडेल्सवर वेटिंग चालू आहे. डॅट्सनने या वर्षी जून महिन्यात ही कार लाँच केली होती. रेडी गोची लाँचिंग प्राईस 2 लाख 38 हजार रुपये ठेवण्यात आली होती. लाँचिंगपूर्वीच 576 जणांनी कार बूक केली होती.
रेडी गोची कमी किंमत आणि फीचर्समुळे ग्राहक चांगली पसंती देत आहेत. या कारला 799 सीसी इंजिन आहे. तर 54 पीएस पॉवर आणि 72 एनएम टॉर्क असून 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. ही कार एका लिटरमध्ये 25.17 किमी चालते, असा दावा कंपनीने केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
