एक्स्प्लोर
VIDEO: डॅनी मॅकस्किलचं खतरनाक सायकलिंग
मुंबई: खतरनाक स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला स्टंट बायकर डॅनी मॅकस्किलचा आणखी एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर धुमाकूळ घालत आहे. Danny MacAskill’s Wee Day Out या नावाचा व्हिडीओ दोन महिन्यापूर्वी यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला. त्याला आजपर्यंत जवळपास 58 लाख हिट्स मिळाल्या आहेत.
गिर्यारोहण, साहसी स्टंट्स असे आपण आजवर अनेकवेळा पाहिले असतील. पण स्टंट बायकर डॅनी मॅकस्किल काही औरच आहे. अत्यंत टोकदार पर्वतकडा, डोंगररांगा, नद्या, झाडं इतकंच नाही तर घरावरुनही अत्यंत चपळाईने तो सायकलिंग करतो.
डॅनी मॅकस्किलने थरारक स्टंटच्या अनेक अफलातून शॉर्टफिल्म बनवल्या आहेत. यापूर्वी ‘द रिज’ नावाची शॉर्टफिल्मही काळजाचा ठोका चुकवणारी होती.
The Ridge
आता Danny MacAskill’s Wee Day Out या शॉर्टफिल्मलाही तुफान हिट्स मिळत आहेत.
हृदयाचा ठोका चुकवणारे स्टंट्स आणि चपळाईचं सायकलिंग असलेली ही शॉर्टफिल्म पाहताना आश्चर्याचा धक्का बसला नाही तर नवलच.. पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
राजकारण
क्रीडा
Advertisement