सावधान! फेसबुकच्या माध्यमातून होतेय फसवणूक
फेसबुक या सोशल मीडिया साईटवर बनावट अकाउंट बनवून फ्रेंडलिस्ट मधील लोकांकडून पैसे मागितले जात आहेत. अनेकजण याला बळीही पडले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. मात्र, सध्या फसवणुकीचा एक सगळ्यात सोपा आणि नवीन मार्ग पाहायला मिळत आहे, तो म्हणजे कोणाचंही फेसबुक अकाउंट बनवून त्याच्या फ्रेंडलिस्ट मधील असलेल्या लोकांकडून पैसे मागणं. काही लोकं याला बळी सुद्धा पडली आहेत.
फेसबूक या माध्यमाने नव्या लोकांची मैत्री होती, ज्या मित्रांच्या संपर्कात नव्हते त्यांचा सहज संपर्क होत होता. मात्र, आता या फेसबुकचा वापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलेल आहे. याला सध्या फसवणुकीचा नवीन ट्रेंडच म्हणावा लागेल. जो सर्वात सोपा आहे. कुठल्याही व्यक्तीचा एक फेसबुक अकाउंट बनवून मेसेंजरद्वारे त्यांच्या फ्रेंडलिस्ट मधील असलेल्या लोकांकडून पैसे मागायचे आणि ऑनलाईन ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये मागून घ्यायचे.
Whatsappमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याची कटकट संपणार; लवकरच खास फिचर लॉन्च होणार
सोशल मीडिया दिवसेंदिवस जितकं सक्रिय होत जात आहे, तितकंच त्याच्यावर सायबर फ्रॉडही सक्रिय होत चालले आहेत. आर्थिक फसवणुकीचे रोज नवीन पर्याय या सायबर भामट्यांकडून शोधले जात असून याचा फटका जास्तीत जास्त सामान्य लोकांना बसत आहे. यापासून सावध राहण्याची अत्यंत गरज सध्या जाणवू लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही ॲक्टिव्ह राहा मात्र त्याच सोशल मीडियापासून आपली फसवणूक होऊ नये यासाठी जास्त अॅक्टिव राहण्याची गरज आहे. त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. फक्त थोडं सावध राहण्याची गरज आहे.
काय काळजी घ्याल? आपल्या मित्रांना यासंदर्भात माहिती द्या. कोणत्याही मित्राने असे पैसे मागितले तर त्याला फोन करुन खात्री करुन घ्या. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्थिक गोष्टींबाबत कुठलीही माहिती अपलोड करु नका. आपल्या सोशल मीडिया अकाउटचे पासवर्ड नेहमी बदलत राहा.
IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस; वायुदलाच्या चित्तथरारक कसरती