(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Phone Charging Tips : सावध व्हा! फोन चार्ज करताना या चुका टाळा
अनेकांना फोन सतत वापरण्याची सवय असते. सारखा फोन वापरल्याने फोनचे चार्जिंग कमी होते.
SmartPhone Charging Tips : अनेकांना फोन सतत वापरण्याची सवय असते. सारखा फोन वापरल्याने फोनचे चार्जिंग कमी होते. चुकीच्या पद्धतीने फोनला चार्जिंग केल्यास फोनच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मोबाईल चार्ज करताना काळजी घेणे आवश्यक आहे. फोन चार्ज करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
फोन पूर्ण चार्ज करू नका-
अनेक लोक फोन 100 टक्के चार्ज करतात. पण एका रिपोर्टनुसार, फोन 100 टक्के चार्ज केल्याने फोनची बॅटरी खराब होते.
फोन डिस्चार्ज होईपर्यंत वापरू नये
काही लोक फोनचा वापर फोन पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत करतात. पण असं केल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते. तसेच बॅटरीची लाईफ देखील कमी होते. फोनची बॅटरी ही लिथियमची असते. त्यामुळे फोन पूर्णपणे डिस्चार्ज होण्याआधीच चार्जिंगला लावा.
इलेक्ट्रिक उपकरणांपासून फोन ठेवा दूर
फ्रिज, वॉशिंग मशीन, डीव्हिडी प्लेयर इत्यादी उपकरणांजवळ फोन चार्जिंगला लावू नका. कारण इलेक्ट्रिक उपकरण गरम होतात. त्यामुळे या उपकरणांच्या जवळ फोन चार्जिंगला लावल्याने फोन खराब होऊ शकतो.
फोन चार्जिंगला लावून कॉलवर बोलू नका-
फोन चार्ज करत असताना कॉलवर बोलणे टाळा. जर तुम्ही चार्जिंग सुरू असताना कॉलवर बोलत असाल तर तुम्हाला करंट लागू शकतो.
Tips for Free WI-FI : फ्री वाय-फाय वापरताय? सावध व्हा! हॅकर्स चोरू शकतात पर्सनल डेटा
खराब क्वालिटीचा चार्जर वापरू नका
बरेच लोक कोणत्याही स्मार्टफोनच्या चार्जरने स्मार्टफोन चार्ज करतात. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते. खराब क्वालिटीचा चार्जर बॅटरीच्या बॅकअपवर वाईट रीतीने परिणाम करू शकतो. म्हणून नेहमी ओरिजनल चार्जर वापरा.
रात्रभर स्मार्टफोन चार्ज करू नका
बरेच लोक झोपताना आपला स्मार्टफोन चार्जिंगवर ठेवतात आणि नंतर सकाळी बाहेर काढतात. जास्त चार्जिंग केल्याने आपले डिव्हाइस जास्त गरम होते आणि बर्याच वेळा असे केल्याने बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे रात्रभर मोबाईल चार्ज करु नका.
SmartPhone Tips : मोबाईलसारखा हॅंग होतो? जाणून घ्या फोनचा स्पिड वाढवण्याची ट्रिक