एक्स्प्लोर
तब्बल 360GB डेटा, BSNLची जबरदस्त ऑफर!
BSNLनं पोस्टपेड यूजर्ससाठी कंपनीनं एक नवा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सला तब्बल 360 जीबी डेटा मिळणार आहे.

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलही आता सज्ज झाली आहे. आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठी कंपनीनं एक नवा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सला तब्बल 360 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची किंमत 444 रुपये आहे.
या स्पेशल टेरिफ प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. 4 जीबी डेटानंतर यूजर्सला डेटा मिळत राहिल पण त्याचा स्पीड मात्र कमी होईल. हा प्लॅन 90 दिवसांसाठी वैध असणार आहे.
या प्लॅनबाबत सांगताना कंपनीनं सांगितलं की, कंपनीनं चौका-444 हा स्पेशल टेरिफ प्लान लाँच केला आहे.
याशिवाय कंपनीनं 298 रुपयांचा देखील आणखी एक प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग देण्यात आलं आहे. मात्र, 1 जीबी डेटानंतर या स्पीड कमी होईल. तसेच हा प्लॅन 23 दिवसांसाठी वैध असेल.
(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)
संबंधित बातम्या :
BSNLचा नवा प्लॅन, 298 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement



















