BlackBerry Will Not Work: आठवणीतला ब्लॅकबेरी अखेर बंद, बहुचर्चित फोन बंद होण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या.
BlackBerry will not Work : जर तुम्हीही ब्लॅकबेरीच्या फोनचे फॅन असाल किंवा तुमच्या घरी हा फोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कंपनीने हा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे.
BlackBerry Die: एकेकाळी स्टेटस आयकॉन असणारा अनेकांना हवाहवासा वाटणारा ब्लॅकबेरी फोन अखेर बंद झाला आहे. तुम्हालाही हा फोन आवडत असेल किंवा तुमच्याकडे हा फोन असेल तर ही बातमी नक्की वाचा. ब्लॅकबेरी कंपनीने नुकतंच म्हणजे 4 जानेवारी रोजी हा फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॅकबेरी हा फोन OS BB10 OS ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. पण आता ही सिस्टीम कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या आठवणीतला हा ब्लॅकबेरी फोन 4 जानेवारीपासून बंद झाला आहे. आता या फोनच्या माध्यमातून कॉल किंवा मेसेज करता येणार नाही. साधा इमर्जन्सी नंबरही वापरता येणार नाही.
तब्बल 64 बटणांच्या या फोनच्या माध्यमातून आता तुम्ही ना कोणाला मेसेज करू शकणार आणि ना कोणाला कॉल करू शकणार. परंतु, असे असले तरीही कंपनीने हा निर्णय फक्त क्लासिक स्मार्टफोनसाठीच लागू केला आहे. तर ब्लॅकबेरीचे (BlackBerry) अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम (Android Operating System)वर चालणारे फोन हे आधीसारखेच सुरु राहणार आहेत.
आयफोनसारखीच होती ब्लॅकबेरीची लोकप्रियता
ब्लॅकबेरी फोनची लोकप्रियता ही जवळपास 7 ते 8 वर्षांपूर्वी आयफोन (iPhone)सारखीच होती. सध्या अनेकांचा स्वप्नवत फोन आय़फोन असला तरी काही वर्षांपूर्वी ही जागा ब्लॅकबेरीची होती. हा फोन खासकरून सिक्युरिटी आणि सेफ्टी फीचर्समुळे तरूणाईमध्ये अधिक लोकप्रिय ठरला होता. सुरुवातीला जेव्हा हा फोन बाजारात आला तेव्हा या फोनची क्रेझ आणि यामधले फीचर्स प्रत्येक युवकाला आकर्षित करीत होते. इन्स्किप्शन फीचर हा या फोनची ताकद होती. परंतु,स्वस्त दरात बरेच फिचर्स देणारे अँड्रॉइड फोन आले आणि हळूहळू त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये ब्लॅकबेरीची ओळख कुठेतरी संपुष्टात आली.
हे ही वाचा -
- UPI Transactions : भारतात UPI नं गाठला नवा उच्चांक; डिसेंबर 2021 मध्ये 456 कोटींचं ट्रान्जेक्शन
- Year Ender 2021 : वर्षभरात नेटकऱ्यांनी कोणते अॅप्स सर्वाधिक डाऊनलोड केले?, वाचा यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]
[/yt]