Asus Zenfone 8 नवी स्मार्टफोन सीरिज लवकरच भारतात लॉन्च होणार, काय असतील फीचर्स?
Asus Zenfone 8 स्मार्टफोनमध्ये 5.9-इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 888 5 जी एसओसी प्रोसेसरसह सुसज्ज आहे.
![Asus Zenfone 8 नवी स्मार्टफोन सीरिज लवकरच भारतात लॉन्च होणार, काय असतील फीचर्स? Asus Zenfone 8 new smartphone series will be launched in India soon, what will be the features? Asus Zenfone 8 नवी स्मार्टफोन सीरिज लवकरच भारतात लॉन्च होणार, काय असतील फीचर्स?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/13/877aa00ff19bc79cfd0a91fa849afb06_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asus Zenfone 8 : तैवानची टेक कंपनी Asus लवकरच आपली नवीन स्मार्टफोन सीरिज Zenfone 8 भारतात लॉन्च करणार आहे. ही सीरिज यावर्षी मे महिन्यात जागतिक बाजारात येणार होती, परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे ती लाँच होऊ शकली नाही. Zenfone 8 ची पहिली झलक मे महिन्यात कंपनीच्या वेबसाइट समोर आली होती. मात्र, कंपनीने अद्याप त्याची लॉन्च डेट जाहीर केली नाही.
लवकरच लाँचची घोषणा
Asus Zenfone 8 च्या लाँचिंगच्या बातम्यांना अधिक हवा मिळाली जेव्हा Asus इंडियाचे दिनेश शर्मा यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये Zenfone 8 लाइनअपचा भारतात लाँचिंगचा उल्लेख केला. कंपनीने लवकरच Zenfone 8 च्या लॉन्चची तारीख जाहीर करणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले.
Zenfone 8 चे संभाव्य फीचर्स
Asus Zenfone 8 स्मार्टफोनमध्ये 5.9-इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 888 5 जी एसओसी प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 16 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. हा Asus फोन Android 11 बेस्ड ZenUI 8 कस्टन स्कीनवर काम करेल. पॉवरसाठी, यात 4,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
Zenfone 8 Flip चे संभाव्य फीचर्स
Zenfone 8 Flip स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश दर 90 हर्ट्ज आहे. फोन स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड ZenUI 8 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यात 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असेल.
कॅमेरा
Zenfone 8 मध्ये दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सेल असेल. त्याचा दुसरा सेन्सर 12 मेगापिक्सलचा असेल. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)