एक्स्प्लोर
बंगळुरूमध्ये बनलेला आयफोन जून महिन्यात मार्केटमध्ये!
बंगळुरू: आयफोनची निर्मिती करणारी अॅपल ही कंपनी भारतात आयफोन्सची निर्मिती करणार हे आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. भारतात बंगळुरूमध्ये आयफोन्सची निर्मिती होईल.
आयफोनच्या निर्मितीसाठी कर्नाटकप्रमाणेच आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि महाराष्ट्र राज्याची सरकारे प्रयत्न करत होती. मात्र सध्या तरी बंगळुरूने बाजी मारल्याचं दिसत आहे.
कर्नाटक सरकारने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून बंगळुरूमध्ये आयफोन्स असेंब्लिंग करण्याच्या अॅपलच्या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे.
बंगळुरूमध्ये आयफोन्सची निर्मिती होणार असल्याच्या बातम्या यापूर्वीच प्रसारीत झाल्या असल्या तरी त्याला अॅपल किंवा कर्नाटक सरकार यापैकी कुणीच दुजोरा देत नव्हतं.
कर्नाटकचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खार्गे यांनी अॅपलबरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अॅपलला हव्या असलेल्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. अॅपलकडून प्रत्यक्ष आयफोन निर्मितीला कधी सुरूवात होईल, याविषयी प्रियांक खार्गे यांनी काहीही स्पष्ट केलेलं नसलं तरी भारतात बनलेला आयफोन बाजारपेठेत येण्यासाठी जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
बंगळुरूच्या पिन्या परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आयफोनची निर्मिती होणार आहे. तैवानच्या विस्ट्रॉन या कंपनीमार्फत इथे आयफोनची निर्मिती होणार आहे.
बंगळुरूमधील या आयफोन निर्मिती केंद्रासाठी डिसेंबरमध्येच नोकरभरतीची जाहिरात अॅपलच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती.
चीन आणि तैवाननंतर आयफोनची निर्मिती करणारा भारत हा तिसरा देश होणार आहे.
संबंधित बातम्या:
भारतात तयार होणार अॅपल आयफोन, किंमतीत होणार घट?
आयफोन 8 ची भारतात निर्मिती, 'मेक इन इंडिया'मुळे दर स्वस्त?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement