एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
iPhoneX, iPhone 8, 8 Plus ची भारतातील किंमत, फीचर्स आणि सर्व काही
अॅपलने आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स या तीन फोनसह अॅपल वॉच सीरिज 3 आणि 4K अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्सही लाँच केला
कॅलिफोर्निया: iPhone च्या दशकपूर्तीनिमित्त अॅपलने बहुप्रतिक्षीत iPhone X हा मास्टरपिस फोन लाँच केला आहे. त्याचसोबतच iPhone 8 आणि iPhone 8 Plus हे फोनही लाँच करण्यात आले.
कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा भव्य लाँचिंग सोहळा पार पडला.
अॅपलने आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स या तीन फोनसह अॅपल वॉच सीरिज 3 आणि 4K अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्सही लाँच केला. अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी या शानदार सोहळ्यात हे फोन लाँन्च केले. हे तीनही फोन वायरलेस चार्जरने चार्ज होतील.
भारतात कधी?
आयफोन 8 आणि 8 प्लस 64 हजारांना मिळणार असून 29 सप्टेंबरला तो भारतात लाँच होणार आहे, तर आयफोन X हा 64 GB चा फोन 89 हजारांच्या घरात, तर 256 GB चा फोन 1 लाख 2 हजार रुपयांच्या घरात आहे. 3 नोव्हेंबरला भारतीय बाजारांमध्ये तो उपलब्ध असेल.
आयफोनच्या किमती
मोबाईल भारतातील किंमत
i phone 8-64 GB - 64 हजार रुपये
i phone8-256 GB - 77 हजार रुपये
i phone8+: 64GB - 73 हजार रुपये
i phone8+ :256GB - 86 हजार रुपये
i phoneX 64GB - 89 हजार रुपये
i phoneX 256GB - 1 लाख 2 हजार रुपये
iPhone X ची जगभरात चर्चा
आयफोनने एकाचवेळी तीन फोन बाजारात आणले असले, तरी सध्या जगभरात iPhone X चीच चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे त्यातील महत्त्वाचं फेस रेकग्निशन अनलॉक फीचर. म्हणजेच तुमचा चेहरा तुमचा फोन लॉक-अनलॉक म्हणजेच पासवर्डचं काम करेल.
अंधारातही तुमचा चेहरा ओळखेल
या फोनमध्ये होम बटण नाही. केवळ तुम्ही त्याच्याकडे पाहा, फोन सुरु किंवा बंद होईल.
या फोनला वरच्या बाजूला स्वाईप केल्यानंतर तो तुम्ही होम बटण म्हणून वापरु शकता. आधी होम बटणवर टच आयडी दिली होती, मात्र आता ना होम बटण आहे, ना टच आयडी.
टच आयडीलाच रिप्लेस करुन फेस आयडी हे नवं फिचर देण्यात आलं आहे. चेहरा पाहून फोन अनलॉक होईल. महत्त्वाचं म्हणजे या फोनच्या कॅमेऱ्यात IR सिस्टिम देण्यात आली आहे. ज्यामुळे जो फोनचा मालक किंवा ज्याच्या चेहऱ्याने हा फोन लॉक केला आहे, त्याचा चेहरा अंधारातही ओळखून फोन अनलॉक होईल.
यासाठी कंपनीने खास ‘ड्युअल कोर कस्टम चिपसेट’ लावला आहे, ज्यामुळे चेहरा हाच फोनची ओळख बनवण्यात आला आहे.
iPhone X चे फीचर्स
- किंमत – 999 डॉलर्स
- भारतातील किंमत – 89 हजार रुपये
- महत्त्वाचं फिचर- फेस आयडी
- मेमरी – 64GB आणि 256 GB
- कॅमेरा – 12 मेगापिक्सल रियर ट्रू डेप्थ कॅमेरा सिस्टिम
- 3D टच फिचर आणि वायरलेस चार्जिंग, बॅटरीक्षमता 7 तासापर्यंत
- पाणी आणि धूळ रोधक
- अमेरिकेत 3 नोव्हेंबरला, तर भारतातही त्याचवेळी उपलब्ध होण्याची शक्यता
- इमोजीद्वारेही चॅट करु करु शकता, एखाद्या व्हिडीओप्रमाणे या इमोजी तुमचा मेसेज पाठवतील. जसे तुम्ही मांजराची इमोजी निवडलात, तर तुमचा व्हिडीओ मेसेज मांजर फॉरवर्ड करेल, पण आवाज तुमचा असेल.
- किंमत 699 डॉलर, भारतात सुमारे 64 हजार
- 15 सप्टेंबरपासून ऑर्डर, 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल
- कॅमेरा - 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
- व्हिडीओ कॅमेरा 4K 60fps व्हिडीओ शूट करतो. हे फीचर असलेला जगातील पहिला फोन
- आयफोन 8 मध्ये A11 चिप आहे, जी जुन्या फोनमधील A10 पेक्षा 70 टक्के जास्त फास्ट आहे
- LTE अडव्हान्स, BT 5.0 आणि ग्लास बॅक देण्यात आला आहे
- या फीचरमुळे तुम्ही रियल वर्ल्डमध्ये गेम खेळू शकता.
- वायरलेस चार्जरसह उपलब्ध
- वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट म्हणजेच पाणी आणि धूळरोधक
- स्क्रीन साईज 4.7 इंच
- किंमत – 799 डॉलर, भारतात सुमारे 70 हजारपेक्षा अधिक
- सिल्व्हर, ग्रे, गोल्ड या रंगात उपलब्ध
- वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट म्हणजेच पाणी आणि धूळरोधक
- वायरलेस चार्जर
- स्क्रीन साईज – 5.5 इंच
- कॅमेरा 12 मेगापिक्सल
- व्हिडीओ कॅमेरा 4K 60fps व्हिडीओ शूट करतो. हे फीचर असलेला जगातील पहिला फोन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement