एक्स्प्लोर
आयफोनच्या बॅटरीत बिघाड, अॅपलकडून अखेर स्पष्टीकरण
![आयफोनच्या बॅटरीत बिघाड, अॅपलकडून अखेर स्पष्टीकरण Apple Clarify On Iphones Sudden Shutdown Problem आयफोनच्या बॅटरीत बिघाड, अॅपलकडून अखेर स्पष्टीकरण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/04175326/iphone-5s-571x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयफोन यूझर्सनी बॅटरीतील बिघाडाबाबत तक्रारी केल्या होत्या. आयफोन अचानक ऑफ होत असल्याचे यूझर्सकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर ज्या यूझर्सना या समस्येला तोंड द्यावं लागलं, त्यांच्यासाठी अॅपलकडून आयफोन 6s डिव्हाईस रिप्लेसमेंट करुन देण्यात आले.
यूझर्सच्या या तक्रारीबाबत अॅपलकडून चायनिज वेबसाईटवर स्पष्टीकरण जाहीर केलं. मात्र, आयफोन 6s सोबतच इतर आयफोन मॉडेल्समध्येही बॅटरीची समस्या असल्याचे यूझर्सचे म्हणणे आहे. अॅपल कंपनीच्या माहितीनुसार, केवळ आयफोन 6s मध्येच बॅटरीची समस्या आहे. कोणत्याही प्रकारची हार्डवेअरची समस्या आयफोनमध्ये नाही किंवा कोणतंही बगसुद्धा नाही.
आयफोनमधील सेफ्टी फीचर्समुळे यूझर्सना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. कोणत्याही बगमुळे बॅटरीची समस्या नाही. अॅपल आपल्या डिव्हाईसचं डिझाईन अशाप्रकारे करतं की विशिष्ट स्थिती आयफोन बंद होईल. म्हणजेच अत्यंत थंड वातावरण असेल आणि आयफोनसाठी ते घातक असेल, तर त्यावेळी आयफोन आपोआप बंद होतं.
बिझनेस इन्सायडरच्या वृत्तानुसार, अॅपल स्टोअरला डिव्हाईसशी संबंधित सर्व तक्रारी मिळत आहेत आणि या तक्रारी केवळ आयफोन 6s पर्यंत मर्यादित नाहीत, तर सर्व डिव्हाईसमधील बॅटरीशी संबंधित तक्रारीही आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)