एक्स्प्लोर
Amazon iPhone Fest: iPhone SE अवघ्या 19,999 रुपयात
अमेझॉन इंडियानं प्री-ख्रिसमस सेलनिमित्त आयफोन फेस्ट सुरु केला आहे. या सेलमध्ये आयफोनवर बरीच सूट देण्यात आली आहे.
मुंबई : अमेझॉन इंडियानं प्री-ख्रिसमस सेलनिमित्त आयफोन फेस्ट सुरु केला आहे. या सेलमध्ये आयफोनवर बरीच सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये कंपनीनं आयफोन 7 आणि आयफोन SE वर सूट भरघोस सूट दिली आहे. आज (गुरुवार) दुपारी दोन वाजेपासून हा सेल सुरु झाला असून तो 9 डिसेंबरपर्यंत असणार आहे.
आयफोन फेस्टमध्ये आयफोन 7 चा 32 जीबी मॉडेल 41,999 रुपयात उपलब्ध आहे. ज्याची सध्याची किंमत 49,000 रुपये आहे. तर आयफोन 7 चा 128 जीबी मॉडेल 51,999 रुपयात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 58,000 रुपये आहे. तर आयफोन 7 च्या 256 जीबी व्हेरिएंट या सेलमध्ये 53,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. ज्याची बाजारात किंमत 74,400 आहे.
याच सेलमध्ये आयफोन SE वरही बरीच सूट देण्यात आली आहे. SEचा 32 जीबी व्हेरिएंट अवघ्या 19,999 रुपयात उपलब्ध असणार आहे. ज्याची किंमत 25,000 रुपये आहे. याशिवाय HDFC कार्डनं पेमेंट केल्यावर 2000 रुपये इंस्टेंट कॅशबॅक मिळेल.
अमेझॉनच्या या सेलमध्ये आयफोन X देखील उपलब्ध आहे. पण यावर कोणतंही फ्लॅट डिस्काउंट असणार नाही. पण ईएमआय किंवा HDFC कार्ड पेमेंट केल्यानंतर 2000 रुपये कॅशबॅक मिळेल.
याशिवाय आपला जुना आयफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 9500 पर्यंत डिस्काउंट मिळू शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement