iPhone 13: अॅमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये सेलची रेलचेल; IPhone 13सह इतर अॅपल फोनवर मिळतेय घसघशीत सूट!
iPhone 13: अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये iPhone 11, iPhone 12, iPhone 13 आणि अॅपलची इतर प्रीमियम उत्पादने या सेलमध्ये घसघशीत सूटसह मिळणार आहेत.
iPhone 13: ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या मोठा सेल सुरु आहे. या ऑनलाईन कंपनीनी त्यांच्या मेगा अन्युअल सेल फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. Amazon ने आजपासून प्राईम सदस्यांसाठी आपला Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 सुरू केला आहे. तर, Flipkart ने त्यांच्या प्लस सदस्यांसाठी Flipkart Big Billion Days 2022 सेल सुरू केला आहे. या दोन्ही कंपन्या आजपासून अर्थात 23 सप्टेंबरपासून या सेलला सुरुवात करत आहेत. या सेलमध्ये आयफोन 13सह अनेक फोन्सवर बंपर सूट मिळणार आहे.
iPhone 11, iPhone 12, iPhone 13 आणि अॅपलची इतर प्रीमियम उत्पादने या सेलमध्ये घसघशीत सूटसह मिळणार आहेत. या उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. त्यामुळे गाहकदेखील आता या सेलमध्ये खरेदी करण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
iPhone 14चे अनावरण
Apple ने आपल्या नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये स्मार्टफोन iPhone 14चे अनावरण केले आहे. नवीन आयफोन लाँच केल्यामुळे, Apple ने त्यांच्या आधीच्या इतर स्मार्टफोन्सच्या किमती देखील कमी केल्या आहेत. भारतीय ग्राहकांसाठी, Flipkart आणि Amazon या मेगा सेलमुळे iPhones आता सामन्यांच्या खिशाला परवडणारे ठरणार आहेत.
मिळतोय बंपर डिस्काउंट!
आयफोन 13 (iPhone 13) ज्याची किंमत सध्या 69,900 रुपये आहे, तो फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये 16,900 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज डिस्काउंटसह खरेदी करण्यास उपलब्ध आहे. एखादा फोन या फोनसोबत एक्सचेंज केल्यास या फोनची किंमत 53,000 रुपयांपर्यंत खाली येते. Axis Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्ते या किंमतीवर अधिकची 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात, ज्यामुळे ही किंमत 49, 505 रुपये इतकी कमी होऊ शकते. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलला आजपासून अर्थात 23 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. प्लस सदस्यांसाठी हा सेल एक दिवस आधी अर्थात गुरुवारीच सुरू झाला आहे.सेल सुरु असला तरी मात्र, या उत्पादनांची किंमत वारंवार बदलत आहे. सेलच्या सुरुवातीला आयफोन 13 (IPhone 13) 47,990 रुपयांना विकला जात होता, मात्र काही मिनिटांतच तो 50,900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
आयफोन 11 आणि 12वरही मोठी सूट!
केवळ आयफोन 13च नाही तर, आयफोन 12च्या किंमतीतही मोठी सूट मिळत आहे. 59,900 रुपये किमतीच्या iPhone 12वर 16,900 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट आणि फ्लिपकार्ट Axis बँक कार्ड्सवर 5 टक्के कॅशबॅक मिळते आहे. दरम्यान अॅमेझॉन 42,999 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या फोनवर 35 टक्के सवलतीसह 14,950 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. तर, 43,900 रुपये इतकी किंमत असणारा आयफोन 11 देखील या डिस्काउंट ऑफरसह विक्रीस उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या :