एक्स्प्लोर
अॅमेझॉन अॅलेक्सामध्ये नवं फीचर, आता हिंग्लिश, हिंदीत बोलणार
या फीचरमुळे भारतातील हजारो अॅलेक्सा युझर आता अॅलेक्साला हिंदीमध्ये गाणं सुरु करण्यासाठी, न्यूज अपडेटसह इतरही कमांड देऊ शकतात.
![अॅमेझॉन अॅलेक्सामध्ये नवं फीचर, आता हिंग्लिश, हिंदीत बोलणार Amazon Alexa gets Hindi, Hinglish in India, अॅमेझॉन अॅलेक्सामध्ये नवं फीचर, आता हिंग्लिश, हिंदीत बोलणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/19083047/Amazon-Alexa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : अॅमेझॉन अॅलेक्सासोबत (Amazon Alexa) तुम्ही आता हिंदी भाषेतही बोलू शकता. अॅमेझॉनने अॅलेक्साच्या या नव्या फीचरची दिल्लीत घोषणा करताना म्हटलं की, युझर आता अॅलेक्ससोबत हिंदी आणि हिंग्लिशमध्येही बोलू शकतात. या फीचरमुळे भारतातील हजारो अॅलेक्सा युझर आता अॅलेक्साला हिंदीमध्ये गाणं सुरु करण्यासाठी, न्यूज अपडेटसह इतरही कमांड देऊ शकतात. अॅलेक्सा हिंदी एको (Echo) फॅमिलीचे सर्व व्हॉईस कंट्रोल्ड डिवायसेसमध्ये उपलब्ध करुन दिले आहेत.
अॅलेक्सासोबत हिंदीत बोलण्यासाठी युझरला सर्वात आधी 'Alexa help me set up hindi' कमांड द्यावी लागेल. सध्याचे एको डिवाईस युजर्स अॅलेक्सा अॅपच्या सेटिंगमध्ये दिलेल्या लँग्वेज ऑप्शनमध्ये जाऊन हिंदी भाषा निवडू शकतात. तर Echo Show युझर्सला यासाठी सेटिंग सेक्शनमध्ये जाऊन स्क्रीन वरुन खालच्या दिशेने स्वाईप करावी लागेल. हे फीचर विशेषत: भारतीय युझरसाठी आणलं आहे. कारण इथे बहुतांश घरात हिंदी आणि इंग्लिश भाषा बोलली जाते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
प्ले म्युझिक
अॅलेक्साकडून युझरला बेस्ट म्युझिक एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने gaana.com सह अनेक म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसोबत हातमिळवणी केली आहे. बॉलिवूडची गाणी ऐकण्यासाठी आता युझरना केवळ 'अॅलेक्सा बॉलिवूड के लेटेस्ट गाने सुनाओ' (अॅलेक्सा बॉलिवडचे लेटेस्ट गाणी ऐकव) कमांड द्यावी लागले. अशाचप्रकारे तुम्हाला किशोर कुमार यांची गाणी ऐकण्यासाठी 'अॅलेक्सा किशोर कुमार के गाने सुनाइए' ही कमांड देऊ शकता. गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही हिंदीमध्ये कमांड द्यावी लागेल. सोबतच अॅलेक्सा गाण्याशई संबंधित माहितीही तुम्हाला देते.
व्हॉईस कमांडद्वारे अलार्म सेट करा
अॅलेक्सा हिंदीत आल्याने युझरना अनेक सोयी मिळण्याची अपेक्षा आहे. अॅलेक्साला तुम्ही प्रश्न विचारण्यासोबतच अलार्म सेट, कॅलेंडर चेक, न्यूज अपडेट, स्पोर्ट्स स्कोअरसह आणखी बरीच कामं करु शकता.
प्रश्न विचारा
अॅलेक्सा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. तुम्ही अॅलेक्साला येणाऱ्या सणांची तारीख विचारु शकता. सोबतच जर घरात मुलं असतील तर त्यांचा गृहपाठ करुन घेण्यासाठीही अॅलेक्साची मदत घेऊ शकता. अॅलेक्सा गणित, सामान्य ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रश्नांचीही उत्तरं देऊ शकते. एवढंच नाही तर तुम्ही अॅलेक्साला शेअर बाजार आणि सोन्याचे दर यांसारखे प्रश्नही विचारु शकता.
स्मार्ट डिवायसेसला कंट्रोल करा
ज्या घरांमध्ये स्मार्ट डिवाईस आहेत, तिथल्या युझरसाठी अॅलेक्साचं हिंदी फीचर फारच मजेशीर असेल. घराचे स्मार्ट बल्बचा प्रकाश कमी करण्यासाठी केवळ 'अॅलेक्सा लाइट धीमी कर दो' ही कमांड द्यावी लागेल. जर तुम्हाला टीव्हीचा आवाज कमी करायचा असेल, तर 'अॅलेक्सा टीवी म्यूट कर दो' बोलू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)