एक्स्प्लोर
आता 250 रुपयांमध्ये एअरटेलचा 10GB 4G डेटा
नवी दिल्ली: एअरटेलने आपल्य प्रीपेड ग्राहकांसाठी शुक्रवारी नव्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी फक्त 250 रुपयांमध्ये 10GB 4G डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑफर सॅमसंगच्या J स्मार्टफोन यूजर्ससाठी असणार आहे. तसेच एअरटेलच्या नव्या आणि जुन्या ग्राहकासाठीदेखील ही ऑफर लागू असेल.
ही ऑफर सॅमसंगच्या J सीरीजमधील स्मार्टफोन धारकांना मिळणार असून, अद्याप सॅमसंग आणि एअरटेल या दोन्ही कंपनींनी कोणत्या मोबाईलवर ही ऑफर लागू असेल, याविषयी अधिकृत माहिती दिली नाही.
याशिवाय जे लोक अजूनही 4G इंटरनेट सेवाचा वापर करत नाहीत, त्यांच्यासाठी 10GB चा 3G डेटा कंपनी देणार आहे. 3G यूजर्ससाठी या 10GB डेटामधील 1GB चा डेटा दिवसा, तर 9GB डेटा रात्री वापरता येणार आहे.
भारती एअरटेलचे मार्केटिंग ऑपरेशन डायरेक्टर अजय पूरी यांनी या ऑफरची माहिती देताना सांगितले की, ''आम्ही सॅमसंगच्या J सीरीजसोबत आमचे संबंध सुधारण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम आहे. ही भागिदारी यूजर्सना अधिक चांगल्या डिव्हाइसमध्ये 4Gचा वापरण्यास मिळेल.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement