एक्स्प्लोर
हृदयाचे ठोके माजणारे अॅपलचं ब्रेसलेट बाजारात लवकरच?

मुंबई: अॅप्पलने नुकताच एका नव्या पेटेंटसाठी अर्ज केला आहे. या अर्जामध्ये कंपनीनी एका नव्या उपकरणाचा उल्लेख केला असून, हे उपकरण 'इलेक्ट्रो कार्डियोग्राफिक सिग्नल' मोजून हृदयाच्या आरोग्याबद्दल माहिती देणार आहे. क्यूजेट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, 'अमेरिकी पेटेंट अॅन्ड ट्रेडमार्क' कार्यालयाकडे दाखल केलेल्या या अर्जामुळे, अॅप्पल हेल्थकेअर क्षेत्रातही काम करण्यास सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.
हे नवे उपकरण एखादी अंगठी किंवा ब्रेसलेटसारखे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या उपकरणाच्या वापरासाठी यूजर्सच्या शरीरातील विविध अवयवांच्या रीडिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
अॅप्पलने गेल्या वर्षी ओपनसोर्स फ्रेमवर्क असलेले एक रिसर्च किट जाहिर केले होते. याद्वारे डॉक्टरांना आपल्या रुग्णांची संख्या आयफोन अॅपवर संकलित करण्यास मदत होत होती.
नुकत्याच 'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत अॅप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुम यांनी सांगितले की, ''अॅप्पलचे नवे घड्याळ अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रक्रियाला सामोरे जाण्यास इच्छूक नाही. मात्र, या घड्याळ्यात एका विशिष्ट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.''
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























