एक्स्प्लोर

भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी

नवी दिल्ली : भारताचा अशा 99 देशांमध्ये समावेश आहे, ज्या देशांवर नुकताच सायबर हल्ला झाला आहे. आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर शनिवारी हॅक करण्यात आले. यामध्ये गंभीर बाब म्हणजे भारतातील 70 टक्के एटीएमवर हा सायबर हल्ला करणं शक्य आहे. कारण भारतातील 70 टक्के एटीएम अशा आऊटडेटेड सॉफ्टवेअरचा वापर करतात, ज्यांना सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेअर बाजार आणि पेमेंट कंपन्यांना अलर्ट जारी केला आहे. भारतातील 70 टक्के एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज XP चा वापर केला जातो. याचं संपूर्ण नियंत्रण बँकांना सिस्टम पुरवणाऱ्या कंपनीच्या हातात आहे. मायक्रोसॉफ्टने अगोदरच विंडोज XP ला सपोर्ट करणं बंद केलं आहे. 2014 पासूनच मायक्रोसॉफ्ट विंडोज XP ला सिक्युरीटी आणि इतर टूल्सही देत नाही. दरम्यान इतर देशातील सायबर हल्ल्यानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोजसाठी अपडेट रिलीज केली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनाही सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला. पोलिसांचे 102 कम्प्युटर फ्रान्समधून हॅक करण्यात आले. सुदैवाने पोलिसांचा सर्व डेटा सुरक्षित आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. जवळपास 100 कम्प्युटर हॅक करण्यात आले होते, मात्र आता काहीही धोका नाही. एका रॅनसमवेअर व्हायरसद्वारे सिस्टम एन्क्रिप्ट करुन लॉक केली जाते. डेटा रिलीज करण्याच्या मोबदल्यात हॅकर्सकडून पैशांची मागणी केली जाते, असं पंतप्रधान कार्यालयातील सायबर सिक्युरिटी सल्लागार गुलशन राय यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं. म्हणून रॅनसमवेयर व्हायरसचा हल्ला इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा. या सायबर हल्ल्यासाठी रेनसमवेयर नावाच्या व्हायरसचा वापर केला असल्याचं म्हटलं जात आहे. रेनसमवेयर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या. हा व्हायरस कम्प्युटरमधील असणाऱ्या फाइल आणि व्हिडिओ इनक्रिप्ट करतो आणि पैसे दिल्यानंतर पुन्हा तुमच्या फाइल सुरु होतात. सुदैवाने हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे. कम्प्युटर व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करावं? तुमच्या सिस्टममध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अॅण्टी व्हायरस टाकून घ्या. तसेच अॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करा. तसेच तुम्ही तुमच्या कम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. कोणत्या ऑनलाईन साइटवरुन काही डाऊनलोड करण्याआधी पहिले हे पाहा की ती वेबसाइट नोंदणीकृत आहे का. तसेच तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा. काय आहे रॅनसमवेयर व्हायरस? अनेक देशात रेनसमवेयर नावाच्या कम्प्युटर व्हायरसला सायबर हल्ल्यासाठी जबाबदर  मानलं जातं. यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो.

संबंधित बातमी : अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Anna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Embed widget