Jio 5G Network : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, 'या' तारखेपर्यंत संपूर्ण देशात Jioचं 5G नेटवर्क
Reliance Jio 5G Network : संपूर्ण देशात डिसेंबर 2023 पर्यंत रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा पोहोचवेल, अशी मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.
Mukesh Ambani on Reliance Jio 5G : रिलायन्स इंडस्ट्रिजचे (Reliance Industries Limited) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओच्या 5G (Reliance Jio 5G Service) इंटरनेट सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ डिसेंबर 2023 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण देशात 5G सेवा पोहोचवेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. आज इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) या कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ
आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेचा (5G Internet Service) शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे. आता कोणती टेलिकॉम कंपनी कोणत्या दरात 5G इंटरनेट सेवा देते हे पाहावं लागणार आहे.
Billionaire Mukesh Ambani says Jio will launch 5G telephony services across India by December 2023
— Press Trust of India (@PTI_News) October 1, 2022
'या' 13 शहरांमध्ये सुरु होणार सेवा
सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल. भारतात आजपासून 5G इंटरनेट सेवा सुरु होणार असून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
#5G is much more than the next generation of connectivity technology. To my mind,it's foundational technology that unlocks full potential of other 21st century technologies like Artificial Intelligence, Internet of things, Robotics, Blockchain & Metaverse: Mukesh Ambani, in Delhi pic.twitter.com/0TWstYctRV
— ANI (@ANI) October 1, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या