एक्स्प्लोर
अँड्रॉईड डिव्हाईसला Judy मालवेअरचा धोका, 3.6 कोटी यूजर्सला फटका
मुंबई: Ransomware व्हायरस गेल्या काही दिवसात बराच धुमाकूळ घातला होता. त्यातून यूजर्स सावरतात न सावरतात तोच आता Judy ‘जूडी’ या नव्या मालवेअरचा धोका अँड्रॉईड यूजर्ससाठी निर्माण झाला आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये 41 अॅपमध्ये Judy मालवेअर सापडला आहे. चेक पॉईंट सिक्युरिटी रिसर्च फर्मनुसार या मालवेअरमुळे जवळजवळ
3.6 कोटी यूजर्स प्रभावित झाले आहेत.
या मालवेअरची गंभीरता पाहून गुगलनं आपल्या प्ले स्टोअरमध्ये मालवेअर सापडलेले संबंधित अॅप हटवले आहेत.
चेक पॉईंटच्या ब्लॉगपोस्टनुसार Judy मालवेअर हे ऑटो क्लिकिंग अॅडवेअर आहे. जे साउथ कोरियाच्या एका कंपनीनं डेव्हलप केलं असून ज्याचं नाव किनिविनि आहे. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात आलं आहे. हे मालवेअर अॅडव्हटाइजमेंटवर फॉल्स क्लिक गोळा करतं आणि या क्लिकमधून मालवेअर तयार करणारी लोकं पैसा कमवतात.
हे मालवेअर अॅप्स जवळजवळ 40 लाख ते 1.8 कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहेत.
काय आहे JUDY मालवेअर?
JUDY मालवेअरचं काम फॉल्स क्लिक गोळा करुन त्या माध्यमातून पैसा कमावणं हा आहे. जर हा मालवेअर असलेला एखादा अॅप तुम्ही डाऊनलोड केला तर तुमच्या डिव्हाइस कमांड सर्व्हरवर हा मालवेअर ताबा घेतो. त्यामुळे चुकीच्या लिंक आणि अॅडवर क्लिक होणं सुरु होतं. प्रत्येक क्लिकच्या मोबदल्यात मालवेअर डेव्हलपर्सना पैसे मिळतात. अशीच मालवेअर डेव्हलपरची कमाई होते.
गुगलमधील प्ले स्टोअर सिक्युरिटी मोडीत काढत या मालवेअरनं 3.6 कोटी अँड्रॉईड यूजर्सला प्रभावित केलं आहे.
संबंधित बातम्या:
सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीच्या कॉम्प्युटरवर ‘रॅन्समवेअर’चा हल्ला?
रॅन्समवेअर अटॅक करुन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्यांची निराशा
सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय कराल?
भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement