एक्स्प्लोर

Mahadev Jankar Warns BJP : लोकसभेच्या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत, अन्यथा सर्व पर्याय खुले; महादेव जानकर यांचा इशारा

Mahadev Jankar Warns BJP : पाच लोकसभा जागा दिल्या तर भाजपसोबत अन्यथा सर्व पर्याय खुले, असा इशारा रासप नेते महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Mahadev Jankar Warns BJP : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत एनडीएमध्ये (NDA) राहू अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहे, असा इशारा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला आहे. एका बाजूला भाजप हा एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे नवीन मित्र बरोबर घेत असताना जुन्या मित्रांकडे दुर्लक्ष होत असल्याची सल महादेव जानकर यांच्या बोलण्यात दिसत होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) प्रमुख माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज पंढरपूरमधील (Pandharpur) संत नामदेव पायरी पासून जनस्वराज्य यात्रेला (Janswarajya Yatra) शुभारंभ केला आहे. सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून जनता शहाणी असते असा टोला शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडलेल्या भाजपाला (BJP) दिला. 

'एक दिवस पंतप्रधान बनून विठ्ठलाच्या दर्शनाला येणार'

राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात आजपासून जानकर हे आपल्या पक्षाची यात्रा घेऊन निघालेले आहेत. भारतीय जनता पक्षाने जर आमचा विचार केला नाही तर लोकसभेच्या देशात 453 जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक दिवस मी देशाचा पंतप्रधान बनणार आणि विठ्ठलाच्या दर्शनाला येणार असा दावाही जानकर यांनी केला. बारामती लोकसभा हा आपला आत्मा असून बारामतीची जागा यासाठीच मागितली असून तिथूनही लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रासपच्या भूमिकेमुळे संघर्ष तीव्र होणार?

2014 पासून साथ दिलेल्या घटक पक्षांना भाजपने कुठल्याही सत्ता स्थापनेत विचारात घेतले नाही. त्यामुळे माजी मंत्री बच्चू कडू तर नाराज झाले आहेत. यानंतर आता जानकर यांची वेगळी भूमिका भाजपाला चांगलीच अडचणीची ठरणार आहे. जानकर यांनी मागितलेल्या सर्व पाचही जागा या भाजप लढवत आला असून आता रासपच्या भूमिकेमुळे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. 

'शरद पवारांनीच अजित पवारांना पाठवलं असावं'

शरद पवार हे खूप हुशार आणि मातब्बर राजकारणी असून सध्या राष्ट्रवादीचे काही नेते अडचणीत आल्याने त्यांनी अजित पवार यांना इकडे पाठवले असण्याची शक्यताही महादेव जानकर यांनी बोलून दाखवली. ज्या पद्धतीने महादेव जानकर यांनी भाजपाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे ते पाहता जुना मित्र असलेला रासप भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

हेही वाचा

Pankaja Munde: पंकजाने सासुरवास सहन करावा, फारच सासुरवास झाला तर भावाचा पक्ष आहेच; महादेव जानकरांचा पंकजा मुंडे यांना सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : ओबीसी, भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
ओबीसींच्या मनात दहशत घालण्यासाठी मनोज जरागेंचा धुमाकूळ, लक्ष्मण हाकेंचा आरोप
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget