एक्स्प्लोर

Pankaja Munde: पंकजाने सासुरवास सहन करावा, फारच सासुरवास झाला तर भावाचा पक्ष आहेच; महादेव जानकरांचा पंकजा मुंडे यांना सल्ला

Mahadev Jankar: गेल्या तीन ते चार वर्षांपासून पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याचं चित्र आहे, तशी खदखद पंकजा मुंडे यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. 

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षात कोंडी होत असल्याचं चित्र असल्याचं गेल्या तीन-चार वर्षांपासून दिसतंय. खुद्द पंकजा मुंडे यांनीही अनेकदा याबाबत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. भाजपने त्यांना केंद्रीय स्तरावर पक्ष संघटनेत महत्त्वाचे पद दिले, पण त्यावर त्या समाधानी नाहीत. परंतु त्यांचे मानसबंधू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मात्र त्यांना सासुरवास सहन करायचा सल्ला देत वेळ पडली तर आपल्या भावाचा पक्ष असल्याचे सांगितले. यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. भाजपमध्ये अस्वस्थ असल्याने कधी एकनाथ खडसे त्यांना राष्ट्रवादीचा मार्ग दाखवतात तर कधी कोणी शिवसेनेकडे अंगुली निर्देश करतो. पंकजा मासबेस लीडर असल्याने त्यांचा पक्षाला फायदा होईल असा प्रत्येकाचा हेतू आहे. तसेच त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असल्याने त्यांच्या पक्षांतराने भाजपलाही हादरा बसेल असंही समजलं जातंय. या विचाराने सध्या सर्वच राजकीय पक्ष पंकजाच्या पुढील वाटचालीवर लक्ष ठेऊन आहेत. मात्र पंकजा मुंडे यांचेचे मानसबंधू असलेल्या महादेव जानकर यांनी त्यांना सासुरवास सहन करण्याचा सल्ला दिला आहे. 

पंकजा या प्रगल्भ असून भाजपच्या त्या मोठ्या नेत्या तथा सचिव असल्याचे जानकर म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही हे पंकजाचे वक्तव्य मंत्रिपदाच्या कार्यकाळात असल्याची आठवण जानकर यांनी यावेळी करून दिली. तर पंकजा मुंडे ज्या पक्षात आहेत तिथे त्यांनी सुखी राहावे, प्रसंगी सासुरवास सहन करावा आणि सासुरवास सहनच झाला नाही तर भावाचा पक्ष असल्याचे जानकर म्हणाले आहेत. अप्रत्यक्षपणे जानकर यांनी आपल्या बहिणीला भाजपातच राहण्याचा सल्ला दिल्याचे त्यांच्या या वक्तव्यावरून दिसतंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात 'वर्षा'वर साडेचार तास महत्वाची बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 29 September 2024Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी, आध्यात्मिक अनुभव : 29 Sep 2024Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Embed widget